२०१५ पुर्वी कर्ज घेणार्या शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमाफी योजनेत समाविष्ट करा.

तहसील कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांकडे मागणी; अखिल भारतीय क्रांतीसेनेचे निवेेेेदन
कळंब / उस्मानाबाद : महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील सन २०१५ नंतर या अटीमुळे मेटाकुटीला आलेला कर्जबाजारी शेतकरी या योजनेपासून वंचित राहिला असल्याने कळंब तहसीलदार यांना अखिल भारतीय क्रांतीसेना पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ मिळावा या मागणीचे निवेदन देण्यात आले.
     जवळपास मागील १३ ते १४ वर्षांपासून महाराष्ट्रात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे.यात वाढती महागाई व शेती मालाला योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.यामुळे शेतकरी काढलेले कर्ज परत भरू शकत नाही.अशा परिस्थितीत काही शेतकऱ्यांनी आत्महत्या ही केल्यात.महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा बर्याचशा शेतकऱ्यांना फायदा मिळालेला नाही.२०१५ पूर्वीही असंख्य किंबहुना ५० % पेक्ष्याही ज्यादा शेतकर्यांचे शेतीचे पीककर्ज थकीत असून त्यांना न्याय मिळावा. त्यांनाही योजनेत समाविष्ट करण्यात येण्यासाठी सन २०१५ नंतर ही अट वगळून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा‌.
      शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ मिळावा या मागणीचे  निवेदन देताना अखिल भारतीय क्रांतीसेनेचे विभागीय संघटक मोहन सोनटक्के,कळंब  तालुकाध्यक्ष अमोल आण्णा शेळके, प्रवीण जाधव, धनंजय कुलकर्णी, दीपक भाकरे, गणेश चंदनशिव व कुंडलिक सालपे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या