क्रांतीसेनेच्या निवेदनाची वनविभागाने घेतली दखल

राहुरी : तालुक्यातील पुर्व भागातील गावांमध्ये बिबटे व हिंस्र प्राण्यांनी काही दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे.यामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.त्याचबरोबर पाळीव प्राण्यांवर हल्ले नित्याचे झाले होते.या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे आर्थीक नुकसान झाले. या गोष्टीची दखल घेत अखिल भारतीय क्रांतीसेनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष संदीप ओहोळ, जिल्हा अध्यक्ष नवनाथ ढगे, महेश हिवाळे, किरण म्हसे,भाऊ पवार,संजय पवार आदी कार्यकर्त्यांनी राहुरी येथील वनविभागाचे अधिकारी यांची दोन दिवसांपूर्वी भेट घेऊन हिंस्र प्राण्यांचा बंदोबस्त करा अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला होता.या निवेदनाची वनविभागाने तातडीने दखल घेत शनिवारी कोंढवड या ठिकाणी बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरे बसवले आहे.वनविभागाने केलेल्या कारवाईमुळे कोंढवड येथील शेतकऱ्यांना हिंस्र प्राण्यांपासुन काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.पिंजरे बसवताना वनविभागाच्या अधिकाऱ्यांना चंद्रभान म्हसे, सुनिल म्हसे, गोरक्षनाथ माळवदे, गोरक्षनाथ म्हसे,वेणुनाथ हिवाळे सर, महेश हिवाळे, रमेश हिवाळे,पवन माळवदे,अमोल माळवदे,हर्षल म्हसे आदी ग्रामस्थांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या