अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी माळवदे

राहुरी : अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी गोरक्षनाथ माळवदे यांची नियुक्ती करण्यात आली.नियुक्तीचे पत्र अखिल भारतीय शिक्षक क्रांतीसेना प्रदेशाध्यक्ष भागचंद औताडे सर यांच्या हस्ते देण्यात आले.
     गोरक्षनाथ माळवदे यांनी क्रांतीसेनेच्या अनेक आंदोलनात सहभागी होत ते यशस्वी केले आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन प्रदेशाध्यक्ष प्रा. संतोष तांबे यांच्या सुचनेनुसार नियुक्ती करण्यात आली.या निवडी प्रसंगी बाबासाहेब म्हसे, मधुकर म्हसे, संदीप ओहोळ, जालिंदर शेडगे, भाऊसाहेब हांडे,अमोल माळवदे आदी उपस्थित होते.या निवडीचे क्रांतीसेनेच्या मार्गदर्शिका मा.आ. डॉ शालिनीताई पाटील,अध्यक्ष प्रा. संतोष तांबे, सरचिटणीस नितीन देशमुख आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या