वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाला क्रांतीसेनेचे निवेदन

राहुरी : तालुक्यातील पुर्व भागातील कोंढवड,शिलेगाव,केंदळ व इतर गावांमध्ये बिबटे व वाघाने या हिंस्र प्राण्यांनी मोठ्या प्रमाणात उच्छाद मांडला आहे.भरदिवसा हे हिंस्र प्राणी माणवी वस्तीत येवुन प्राळीव प्राण्याना ( शेळी, मेंढ्या आदी) तसेच शेतकरी बांधवांना लक्ष करीत आहे.यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.या कारणांमुळे वनविभागाने या हिंस्र प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी या भागात पिंजरे लावण्यासाठी क्रांतीसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
  यावेळी अखिल भारतीय क्रांतीसेनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष संदीप ओहोळ, जिल्हा अध्यक्ष नवनाथ ढगे, महेश हिवाळे,किरण म्हसे, भाऊ पवार आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या