कोंढवड तांदुळवाडी येथील मुळा नदीवर बंधारा बांधण्यासाठी ना.प्राजक्त तनपुरेंना साकडे

राहुरी : कोंढवड तांदुळवाडी येथील मुळा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यासाठी क्रांतीसेनेच्या शिष्टमंडळाने राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांची कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी येथे भेट घेत मागणी केली आहे.
      निवेदनात म्हटले आहे की, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ यांनी को.प.बंधारा मानोरीतील शिल्लक १७९८ सघमी पाणीसाठा प्रस्तावित को.प. बंधारा देसवंडीच्या मंजुरीसाठी शासनाकडे जुन २०१९ मध्ये पाठवला. को. प.बंधारा मानोरी पुर्ण क्षमतेने भरल्यास शिलेगाव,आरडगाव,कोंढवड व तांदुळवाडी या गावांना फायदा होतो.परंतु खरे पाहिले तर या शिल्लक पाणीसाठ्यावर या गावातील शेतकऱ्यांचा हक्क आहे.त्याचप्रमाणे या ठिकाणी बंधारा बांधल्यास मुळा नदीच्या वरील बाजुस असलेल्या देसवंडी या गावालाही फायदा होणार आहे.
       तसेच पुर्वीच्या काळी असे म्हटले जाते की, मुळा नदी व देवनदी यांचे नाते हे सासु सुनाचे आहे असे बोलले जाते.म्हणजे देवनदीला सडे गावापासून जास्त उतार असल्याने मुळा नदी व देवनदी या ठिकाणी जास्त पाणी एकत्र आल्यास राहुरी शहर पाण्याखाली जाऊ शकते व राहुरी शहरातील बराचसा भाग हा पुर रेषेखाली येत असल्याने सांगली,कोल्हापूर या ठिकाणी घडलेल्या घटनेसारखे भयंकर पुरस्थिती निर्माण होईल.यामुळे आपल्याला सुचवलेल्या को.प. बंधारा देसवंडी हा प्रस्ताव हा भविष्यात राहुरी शहराच्या दृष्टीने हानिकारक असल्याने आपण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांच्या दुरदृष्टीतुन विचार करून राहुरी शहराची भविष्यात या बंधाऱ्यामुळे हानी होऊ नये .यासाठी कोंढवड तांदुळवाडी या ठिकाणी बंधारा बांधावा.यामुळे देसवंडी बंधारामुळे ज्या गावांना फायदा होणार आहे.त्यांनाही या बंधाऱ्याचा फायदा होईल व राहुरी शहरातही भविष्यात कोणतीही दुर्घटना घडणार नाही.या सर्व बाबींचा गांभीर्यपूर्वक विचार होवुन योग्य निर्णय घेण्याची मागणी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे जगन्नाथ पंढरीनाथ म्हसे,गोरक्षनाथ माळवदे, मच्छिंद्र पेरणे, जगन्नाथ भाऊसाहेब म्हसे,राज्य संपर्क प्रमुख मधुकर म्हसे आदींच्या क्रांती सेनेचा शिष्टमंडळाने केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या