अखिल भारतीय क्रांतीसेनेचे महावितरण कंपनीला निवेदन
राहुरी : तालुक्यातील शेतकऱ्यांना दिवसाची थ्री फेज वीज उपलब्ध करून देण्यात यावी,अशी मागणी अखिल भारतीय क्रांतीसेनेने महावितरणला दिलेल्या निवेदनात केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, राहुरी तालुक्यातील पुर्व भागातील गावांमध्ये बिबटे व वाघ या हिंस्र प्राण्यांनी मोठ्या प्रमाणात उच्छाद मांडला आहे.यामुळे शेतकरी बांधवांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यातच महावितरण कंपनीने एक आठवडा दिवसा व एक आठवडा रात्रीची थ्री फेज लाईट पुरवठा करत आहे. हिंस्र प्राण्यांच्या भितीमुळे शेतकरी रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यासाठी शेतीमध्ये जाऊ शकत नाही.शेतीसाठी पाणी असुनही हिंस्र प्राण्यांच्या भितीमुळे शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात जात नाही.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे नुकसान होत आहे.यामुळे शेतकऱ्यांचे आर्थीक नुकसान होत आहे.म्हणुन महावितरण कंपनीने शेतकऱ्यांचे आर्थीक नुकसान टाळण्यासाठी दिवसाची थ्री फेज वीज पुरवठा सुरू करावी. दिवसाची थ्री फेज वीज पुरवठा सुरू न केल्यास अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या वतीने महावितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.यावेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष संदीप ओहोळ, जिल्हा अध्यक्ष नवनाथ ढगे, महेश हिवाळे, किरण म्हसे,भाऊ पवार आदींनी दिला आहे.
0 टिप्पण्या