श्रीगोंदा : तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई व प्रधान मंत्री सन्मान योजना मधील येणारे पैसे कॅनरा बॅक श्रीगोंदा मध्ये ज्या शेतकर्यांचे खाते आहेत. त्या शेतकर्याना मिळालेले पैसे बॅकेने शेतकर्याच्या खात्यामधुन शेतकर्याच्या कर्जा पोटी परस्पर वजा करून घेतले. ती रक्कम परत शेतकर्याच्या खात्यामध्ये दहा दिवसात जमा करावी अन्यथा कोणत्याही प्रकारची सुचना न देता आखिल भारतीय क्रांती सेना बॅंकेला टाळे लावू असे निवेदन अखिल भारतीय क्रांती सेना पक्ष यांच्या वतीने देण्यात आले. यावेळी जिल्हा अध्यक्ष सुभाष दरेकर, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश कुरूमकर, तालुका अध्यक्ष संदीप डेबरे व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
0 टिप्पण्या