पिंपल्स् (तारुण्यपीटिका) विषयी माहिती

 

सध्या तरुणांमध्ये सर्वात जास्त आढळणारा पिंपल्स् (तारुण्यपीटिका) हा त्वचाविकार.          आयुर्वेदामध्ये पिंपल्स् ला तारुण्यपीटिका म्हणजेच तारुण्यात दिसणाऱ्या पीटिका,
मुखदूशिका म्हणजे चेहऱ्याचे सौंदर्य घालवणाऱ्या पीटिका अश्या प्रकारची वेगवेगळी समर्पक नावे दिलेली आहेत.
     आयुर्वेदामध्ये हा आजार होण्यामागे वेगळ्या प्रकारची कारणे उहन करता येतात.कारणांच्या आधारावर चिकित्सेमध्ये वैविध्यता येते.
तिखट,आंबट, खारट,चमचमीत खाणे,उष्ण आहार विहार सेवन अशा प्रकारच्या कारणांमुळे पिंपल्स येतात ही कारणे सर्वांच्या परिचयाची आहेतच.पण यापेक्षाही काही वेगळी कारणे आपण पाहू.
     तरुणपणात हार्मोन्समध्ये झालेल्या बदलामुळे चेहऱ्यावर पिंपल्स दिसायला लागतात.यासाठी आयुर्वेदामध्ये चेहऱ्यावर लावायला शीत लेप,पोटात घेण्यासाठी औषधे दिली जातात.
रक्ताची खूप दृष्टी असेल व पिंपल्स फार मोठ्या होत असतील तर त्यासाठी आयुर्वेदामध्ये रक्तमोक्षण म्हणजे चेहर्‍यावर जळू लावून रक्त काढणे हे कर्म केले जाते.यामुळे स्थानिक दूषित रक्त निघते व पिंपल्स् ची साईज कमी होण्यास व त्या निघून जाण्यास मदत होते.चेहऱ्याची त्वचा साफ करून तिथला अतिरिक्त स्निग्धांश काढून चेहऱ्यावर ताज्या औषधींचा लेप केला असता अतिशय सुंदर परिणाम दिसायला लागतो.
काही रुग्णांमध्ये मलबद्धतेची तक्रार असते त्यामुळे पिंपल्स् येत असतात अशावेळी त्या कारणांचा विचार करून चिकित्सा दिली जाते.
कॉस्मेटिक क्रिम्स् चा खूप वापर केल्यामुळे ही काहींना पिंपल्सची तक्रार जाणवते अशांमध्ये विषाचा विचार करून विशिष्ट प्रकारचे लेप दिले जातात.काहींमध्ये याच पिंपल्स खांद्यावर,पाठीवर,डोक्यात दिसायला लागतात अशांमध्येही आयुर्वेदीय औषधांचा सुंदर परिणाम दिसतो.काही रुग्णांत केसातील कोंड्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स् दिसतात.काही रुग्णांमध्ये त्वचा अतिशय तेलकट असते त्यामुळे पिंपल्स् येत असतात. अशा रुग्णांमध्ये तेलकटपणा घालवण्यासाठी पोटातून औषधे घ्यावी लागतात. चाळीशी नंतर होणाऱ्या पिंपल्स् मध्ये चिकित्सेचा वेगळा विचार करावा लागतो.
नस्य,रक्तमोक्षण,विरेचन अशा प्रकारच्या कर्मांचाही पिंपल्स मध्ये खूप चांगला उपयोग होतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या