अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम १९ फेब्रुवारी २०२० पूर्वी सुरु करण्याची उस्मानाबाद येथील अखिल भारतीय क्रांतीसेनेची मागणी


निवेदन देताना तालुकाध्यक्ष अमोल आण्णा शेळके, मोहन सोनटक्के, बंटी करंजकर, शिवाजी करळे, लहुराज अष्टेकर, अजय पारवे.

कळंब प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे तमाम देशाचे आराध्य दैवत आहे. आजवर अनेक पक्ष संघटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करत सत्तेत विराजमान झाले आहे. आपल्या शिवभक्ती बद्दल आम्हास काही शंका नाही. परंतु गेल्या अनेक वर्षापासून अरबी समुद्रातील शिवस्मराकाचा प्रश्न प्रलंबित आहे. हे स्मारक व्हावे. म्हणून अनेक पक्ष संघटनानी वेळोवेळी आंदोलने केली. परंतु प्रत्येक सरकारने या प्रश्नावर जनतेच्या तोंडाला पानेच पुसली आहे. २००४ पासून सत्तेत असलेल्या प्रत्येक सरकारच्या निवडणूक जाहीरनाम्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्यदिव्य शिवस्मारक उभारण्याचे खोटे आश्वासन देऊन जनतेला गाजरच देण्यात आले आहे. परंतु आता महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता हे सहन करणार नाही.मागील सरकारने शिवस्मारक समिती निर्माण केली. मा. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते भूमी पूजन करण्यात आले. परंतु अद्याप पुढे काहीही हालचाल झालेली नाही. कोणतेच काम न होता मागील सरकारने अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा तब्बल ८० कोटी रुपयाचा खर्च झाल्याचा सांगितला आहे. आपल्या सरकार कडून आरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या कामाबाबत अपेक्षा आहे कि आपण हे काम तातडीने सुरु करून पूर्ण करावे. आपणास या निवदेना द्वारे विनंती करण्यात येते कि, १९ फेब्रुवारी २०२० छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती पूर्वी आपण आरबी समुद्रातील नियोजित शिवस्मारकाचे काम सुरु करावे. अन्यथा अखिल भारतीय क्रांती सेनेच्या वतीने उस्मानाबाद जिल्ह्यात आंदोलने करण्यात येईल. या निवेदनावर अमोल आण्णा शेळके (तालुका अध्यक्ष कळंब अखिल भारतीय क्रांतीसेना), मोहन सोनटक्के (मराठवाडा संघटक अखिल भारतीय क्रांतीसेना ) यांनी सह्या केल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या