ध्वज संहितेचे उल्लंघन केल्या प्रकरणी अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी-अखिल भारतीय क्रांतिसेनेची मागणी

उपसचिव ग्रामविकास विभाग यांनी दि.२६ नोव्हे. रोजी संविधानदिनी ध्वजारोहनाचे पावित्र्य न राखता दिशाभूल करणारे आदेश देऊन ध्वज संहितेचे उल्लंघन केल्या प्रकरणी अधिकाऱ्यांवर तत्काळ कार्यवाही करावी.अशी मागणी अखिल भारतीय क्रांतिसेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष तांबे पाटील व प्रदेश सरचिटणीस नितीन देशमुख यांनी ग्रामविकास खात्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे.

ग्रामविकास विभागाचे उपसचिव श्री नागरगोजे यांनी संविधान दिन साजरा करण्याबद्दल आदेश जारी केले होते.या पत्रात स्थानिक स्वराज्य संस्थाचे कार्यालय व शाळेमध्ये ध्वजारोहण करण्याचे आदेश दिले होते.परंतु हे आदेश गांभीर्यपूर्वक नव्हते.सदरील पत्रात ध्वजारोहण करण्याबाबतची सूचना हि सर्वात खाली होती.हि सूचना सर्वात वरती पाहिजे होती.परंतु संबधित अधिकारयाने या बाबत अत्यंत हलगर्जीपणा केलेला आहे.या दिवशी ध्वजारोहण करण्याची परंपरा नाही.जर तसा नियम करायचा होता तर आपल्याशी नित संवाद असायला पाहिजे होता ,परंतु शेवटच्या दिवसापर्यंत संबंधित पत्र हे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या इमेल वर नव्हते.त्यामुळे पत्राच्या सत्यतेबद्दल प्रचंड शंकास्पद परस्थिती होती.अधिकाऱ्यांनी आयत्या वेळेला सोयीचा आदेश काढून अजूनच संभ्रम निर्माण केला. ध्वजारोहनाचे आकरण आदेश देणे,तो आदेश आयत्या वेळेला रद्द करणे ,ध्वजारोहनाचा आदेश पत्रामध्ये अग्रक्रमात नसणे ,वेगवेगळे पत्र काढून संभ्रम निर्माण करणे , हि कृती ध्वजसंहितेचे उल्लंघन करणारी आहे.ध्वजाचे पावित्र्य न राखणारी कृती आहे.त्यामुळे आपल्या विभागातील अत्यंत जबाबदार अधिकारी नागरगोजे साहेब यांची व इतर ज्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रभर वेगवेगळी पत्र काढून जो संभ्रम निर्माण केला,व ध्वज संहितेचा भंग केला अशा सर्व अधिकाऱ्यांचा आम्ही अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या वतीने तीव्र निषेध करतो.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन असे आदेश काढणाऱ्या व ध्वजाचा अपमान करणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी ते गटशिक्षणाधिकारी स्तरातील बेजवाबदार अधिकाऱ्यांची तत्काळ चौकशी करून त्यांच्यावर कडक कार्यवाही करावी. अन्यथा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये मुख्यालयी अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल.असा इशारा यावेळी देण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या