अखिल भारतीय क्रांतिसेना व मित्र पक्ष,सामाजिक संघटना मिळून स्थापन करणार प्रतिकात्मक सरकार


15 दिवस होऊन ही सरकार स्थापन न करणाऱ्यांच्या निषेधार्थ अखिल भारतीय क्रांतिसेना व इतर मित्र पक्ष,सामाजिक संघटना मिळून स्थापन करणार प्रतिकात्मक सरकार

विधानसभा २०१९ निवडणुकीचा निकाल लागून जवळपास १४ दिवस झाले आहेत,परंतु अद्याप हि राज्यामध्ये विधिवत सरकारची स्थापना झालेली नाही.राज्यातील शेतकरी आस्मानी संकटाने मोडून पडला आहे,उध्वस्त झाला आहे.तरीही या राज्यामध्ये सरकार स्थापन झालेले नाही,हे एक प्रकारच सुलतानी संकटच आहे.सत्तेच्या नादामध्ये शेतकरी,कष्टकरी,सर्वसामान्य जनतेकडे पाहायला आमदारांना वेळ नाही.जनतेने दिलेल्या कौलाची एक प्रकारे क्रूर चेष्टा चाललेली आहे.एकीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणतात कि,काळजी वाहू सरकारला मर्यादा आहेत,पण तरी हि सरकार स्थापन न करता सत्तेचा घोडे बाजार मांडला जात आहे.हे वागणे म्हणजे जनतेच्या,शेतकऱ्यांच्या दुखावर मीठ चोळण्यासारखे आहे.म्हणूनच ह्या गोष्टीचा निषेध म्हणून अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या वतीने बजाजनगर येथे दि.०९ नोव्हेंबर १९,शनिवार रोजी दुपारी १२.०० वा. महाराणा प्रताप चौक,बजाजनगर येथे सर्व सामान्य जनतेचे प्रतीकात्मक सरकार स्थापन करण्याचे  आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनामध्ये जेष्ठ कार्यकर्त्यांच्या हस्ते प्रतीकात्मक मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रीमंडळ पद आणि गोपनीयतेची शपथ घेउन आपल्या खात्याच्या वतीने जनसामान्यांना अभिप्रेत असलेल्या घोषणा करतील व पत्रकार परिषद घेतील अशी माहिती आंदोलनचे मुख्य संयोजक तथा क्रांतीसेनेचे प्रदेश सरचिटणीस नितीन देशमुख यांनी दिली.या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन क्रांतीसेनेचे दिनेश दुधाट,औदुंबर देवडकर,मनोहर निकम,राजू शेरे,दिपक गायकवाड,कृष्णा सावंत,साईनाथ कासोळे इत्यादींनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या