शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करण्याची अखिल भारतीय क्रांतीसेनेची मागणी

कळमनुरी/ हिंगोली : कळमनुरी तालुक्यात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने वीज वितरण कंपनीने सक्तीचे वीज बिल वसुली थांबवुन शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करण्याची मागणी कळमनुरी वीज वितरण कंपनीच्या उपअभियंता यांना अखिल भारतीय क्रांती सेनेच्या वतीने करण्यात आली.
       कळमनुरी तालुक्यात  अतिवृष्टी होऊन पिकांचे अतोनात नुकसान झालेले असुन शेतकरी तुर्त वीज बिल देयके भरण्यास असमर्थ आहेत. विज महामंडळाच्या माध्यमातून सक्तीचे वीज बिल वसुली करण्यात येत असल्याचे समजते व वीज जोडणी तोडण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा सहानुभूती पुर्वक विचार करून वीज वितरण कंपनीने सक्तीचे वीज बिल वसुली थांबवुन शेतकऱ्यांचे देयके माफ करण्याच्या मागणीचे निवेदन देताना अखिल भारतीय किसान क्रांतीसेना अध्यक्ष राजु पाटील गौळकर, चिचोर्डी चे सरपंच रमेश कोरनर व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या