शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी छावा क्रांतीवीर सेनेचा चक्काजाम


निफाड तहसीलदार यांनी तात्काळ मागण्या शासन दरबारी मांडण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
       नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून अतिवृष्टीमुळे  नुकसान झालेल्या शेतकर्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई तसेच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी,वीजबिल माफी व  विद्यालयीन,महाविद्यालयीन,उच्च महाविद्यालयीन पर्यंत 
शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण विनाशुल्क देण्याची मागणी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे.
     नाशिक जिल्ह्यासह महाराष्टात सर्वत्र अवकाळी पाऊस झाला असुन अजूनही थांबण्याच नाव घेत नाही  खरिपाची अपरिमित हानी झाली आहे. पिकांचे नुकसान कोट्यवधी रूपयांच्या घरात आहे. यामध्ये द्राक्ष ,सोयाबीन ,मका, कापूस ,कडधान्ये आदी पिकांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. सतत कोसळणाऱ्या पावसाने सर्वच भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.हजारो एकरावरील द्राक्षाचे पीक धोक्यात आले आहे.फुलोरा अवस्थेतील बागा संकटात सापडल्या आहे.नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागातील शेतात पाणी साचल्यामुळे शेतातील मका, बाजरी, सोयाबीन, कपाशी, कांदे, कांद्याचे, रोप, टोमॅटो,भुईमूग इत्यादी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.शेतात उभ्या असलेल्या पिकांसोबतच सोंगणीला आलेले व सोंगुण ठेवलेले पिक पावसामुळे खराब झाले आहे. मका ,बाजरी ,ज्वारी आदींचा चारा सुद्धा सडून गेल्यामुळे चाऱ्याचा सुद्धा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. पिकांना कोंब फुटले आहे. कांदा पिकाचे सुद्धा नुकसान झाले आहे. कांद्याच्या रोपांसह शेतात लागवड केलेला कांदा सडू लागला आहे. भौगोलीक विस्तार व झालेले नुकसान पाहता पंचनामे करण्यासाठी वेळ कमी आहे. फक्त उभ्या असलेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे होत आहेत. सोंगणी करून शेतात ठेवलेल्या किंवा वाळत घातलेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे नाकारले जात आहे. बहुतांश शेतकऱ्यांना यामुळे भरपाई पासून वंचित रहावे लागणार आहे. शेतकऱ्यांवर असा अन्याय होऊ नये यासाठी, उभ्या पिकांबरोबरच सोंगणी करून रचून ठेवलेल्या पिकांच्या नुकसानीचेही पंचनामे करावेत.ग्रामपंचायती मार्फत नैसर्गिक आपत्तीत नुकसानभरपाई साठी १००% पंचनामे करावेत असे ठराव विहीत मार्गाने शासनाकडे मागविण्यात यावे. वेळेत पंचनामे व्हावेत यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ नियुक्त करावे व भेदभाव न करता सर्व शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करावे. अतिवृष्टीमुळे अर्थव्यवस्थेचा कणा असणारा शेतकरी पुरता कोलमडलेला आहे त्याला परत उभे करायचे असेल तर कधी नव्हे असे झालेले  नुकसान भरून तर निघणारे नाही परंतु त्याला व आपल्या जगाच्या पोशिंद्याला जगवण्यासाठी भरीव नुकसान भरपाई तातडीने खात्यात जमा करावी.त्यामुळे ठोस भूमिका घेऊन तात्काळ शेतकऱ्यांना दिलासा देऊन भविष्यात आकस्मित संकटांना सामोरे जाण्यासाठी शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरल्यावर काय होते ते शासन व प्रशासन आपण चांगले जाणता.
परिस्थितीनुसार शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष असून त्याचा कधीही भडका होईल याची वाट न पाहता शासनाने आमच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन आम्हास दिलासा द्यावा.अन्यथा मोठ्या जनआंदोलनास शासन,प्रशासनाने तयार रहावे,असा छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने जाहीर इशारा दिला आहे.
   यावेळी संस्थापक अध्यक्ष करण गायकर,शिवा तेलंग,उमेश शिंदे,शिवाजी मोरे, संतोष माळोदे नवनाथ शिंदे,विजय खर्जुल,नितीन दातीर,सतीश नवले,वंदना कोल्हे,ज्ञानेश्वर थोरात ,नितीन सातपुते,किरण बोरसे, नितीन पाटील ,सागर पवार ,गणेश दळवी ,सागर शेजवळ,आकाश हिरे ,विकास गुळवे,किरण डोके ,विक्रम शेजवळ ,सतीश शिंदे,मनोरमा पाटील ,सचिन जाधव ,शिवम देशमुख ,करण शिंदे,गणेश ढिकले,आदित्य पाटील ,सुनील भोर ,रोहन सपकाळ ,रोहित गोसावी ,अनिल खरात ,रोशन टर्ले,ओंकार झेंडफळे ,किरण जाधव ,आश्लेषा पाटील ,रंजनी मराठे, ,दीपक इकडे ,कारभारी सावंत,सागर जाधव, रवी धोंगडे,रवी गव्हाणे,आदींसह शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या