नगर मनमाड महामार्ग दुरुस्तीच्या क्रांतीसेनेच्या पाठपुराव्याला यश

राहुरी प्रतिनिधी : नगर मनमाड रस्ता दुरुस्ती करण्या बाबत अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या निवेदनाची दखल घेऊन संबंधित कार्यालयांनी कार्यवाही केल्याने अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे,असे प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे यांनी सांगितले.
     सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे कार्यसन अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी २२ आक्टोबर रोजी  अतितात्काल नगर मनमाड रस्ता दुरुस्ती करण्याचे आदेश व केलेल्या कामाची माहिती तक्रारदार मधुकर म्हसे यांना पत्राद्वारे कळविण्यात यावे,असे पत्र संबंधित कार्यालयास दिले होते.
      या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम मंडळ नगरचे अधिक्षक अभियंता यांनी जागतिक बँक प्रकल्प कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधुन तातडीने कारवाई करण्यात यावी, असे सांगितले.या अनुषंगाने २२ आक्टोबर रोजी वाहतुक सुरळीत राहण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल असे पत्र जागतिक बँक प्रकल्प कार्यकारी अधिकारी यांनी अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ यांना पाठवले होते.
     ६ नोव्हेंबर रोजी जागतिक बँक प्रकल्प कार्यकारी अधिकारी नगर यांनी सादर केलेल्या अहवालाबद्दल मधुकर म्हसे यांना पत्राद्वारे कळविण्यात आले.या सादर केलेल्या अहवालाबद्दल मधुकर म्हसे संतुष्ट न झाल्याने राहुरी फॅक्टरी येथील सामाजिक कार्यकर्ते वसंतराव कदम,प्रसाद लोखंडे, श्रीकांत पाटोळे, अमोल वाळुंज व इतर युवकांच्या सहकार्याने राहुरी फक्टरीॅ या ठिकाणी उपोषण करणार असल्याचे निवेदन ७ नोव्हेंबर रोजी अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ नगर यांना ई-मेल द्वारे पाठवले होते.
      या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम मंडळ नगर यांनी संबंधित निवेदन कार्यकारी अधिकारी यांनी पाठवलेले निवेदन जागतिक बँक प्रकल्प विभाग यांना १४ नोव्हेंबर रोजी प्राप्त होताच जागतिक बँक प्रकल्प कार्यकारी अधिकारी नगर यांनी खडी व डांबराने रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात येईल,असे पत्र पाठवल्याने अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याचे समाधान मधुकर म्हसे यांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या