कर्जत-जामखेड/ प्रतिनिधी : अखिल भारतीय क्रांतीसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज रोहित पवार यांची भेट घेत जाहिर पाठिंबा दिला.रोहित पवार यांनी कर्जत जामखेड तालुक्यात समाज हिताचे विविध सामाजिक उपक्रम राबविल्याने क्रांतीसेनेने या विधानसभा निवडणुकीत त्यांना पाठिंबा दिला आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुभाष दरेकर,युवक जिल्हाध्यक्ष शब्बीर शेख, किसान क्रांतीसेना तालुकाध्यक्ष इंद्रजीत शिंदे,युवक तालुकाध्यक्ष साजन शेख,तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब सुद्रिक,सोशल मीडिया प्रमुख अक्षय मांडगे,युवक तालुका उपाध्यक्ष पप्पु देशमुख आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच याप्रसंगी रोहित पवार यांनी अखिल भारतीय क्रांती सेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
0 टिप्पण्या