क्रांतीसेना प्राजक्त तनपुरेंना सहकार्य करणार - म्हसे

राहुरी/प्रतिनिधी : राहुरी येथील अखिल भारतीय क्रांतीसेना पक्षाच्या आयोजित बैठकीत राहुरी  विधानसभेत प्राजक्त तनपुरे यांना एकमताने सहकार्य करण्याचे ठरले आहे.
           राहुरी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांना तालुक्यातील प्रश्नांची जाण आसणारे उच्च शिक्षण घेतलेले उमेदवार आहे. राहुरी तालुक्यातील पाणी प्रश्नासाठी, बेरोजगारांसाठी रोजगार निर्मिती, होतकरू अभ्यासु विद्यार्थ्यांसाठी गटा- गटामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यासंबंधी, सुशिक्षित बेरोजगारांना उद्योग धंद्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्राजक्त तनपुरे यांनी वचननामा मध्ये  नमुद केल्याने राहुरी तालुक्यातील विकासासाठी आवश्यक असणार्या प्रश्नांची प्राजक्त तनपुरे यांना तळमळ असल्याने अखिल भारतीय क्रांतीसेना पक्षातर्फे प्राजक्त तनपुरे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे,असे यावेळी क्रांतीसेनेचे राज्य संपर्क प्रमुख मधुकर म्हसे यांनी सांगितले. यावेळी क्रांतीसेनेचे  जालिंदर शेडगे, संदीप ओहोळ, नवनाथ ढगे, गोरक्षनाथ म्हसे, शिवाजी आढाव, संदीप उंडे, गितेश देवरे,श्याम कदम, सचिन गागरे,संतोष मेहेत्रे, सोमनाथ वने, कृष्णा तारडे, बापुसाहेब बोरकर, संदीप गाडे, सागर लोंढे, संतोष घोरपडे, अंकुश मुसमाडे,राजु शेख,प्रसाद लोखंडे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या