संगमनेर/प्रतिनिधी : सुकेवाडी गावचे सुपुत्र इंजि.युवराज सातपुते यांची अखिल भारतीय क्रांतिसेनेच्या उत्तर नगर जिल्हा युवा अध्यक्षपदी निवड झाली व गावात नवचैतन्य व उत्सवाचे वातावरण निर्माण झाले.समस्त ग्रामस्थांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.या नवडीनंतर त्यांचा नागरी सत्कार सुकेवाडी गावात पार पडला.
कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी संगमनेर दूध डेअरीचे चेअरमन दादासाहेब कुटे बोलताना म्हणाले की,युवराज सातपुते यांची निवड म्हणजे सुकेवाडीकरांच्या गौरवात अजून भर आहे.त्याच्यासारखा उच्च शिक्षित तरुण समाजाप्रती सदैव कटिबद्ध आहे, या गोष्टीचा अभिमान वाटतो.यापुढील कार्यासाठी आम्ही सदैव त्यांच्या बरोबर आहोत. तंटामुक्तीचे अध्यक्ष केशवराव जाधव म्हणाले की तरुण युवक जर पुढे आला तर गावागावात परिवर्तन होऊ शकते,युवराज सातपुते यांच्या भावी वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.छावा संघटनेचे उपाध्यक्ष खंडू सातपुते म्हणाले की, कौतूक व अभिमान आज आम्हास युवराजच्या रूपाने मिळाला आहे. यावेळी बोलताना इंजि.युवराज सातपुते म्हणाले की,झालेली निवड व गावकऱ्यांचे प्रेम याला मी कधीही गालगोट लागू देणार नाही व सदैव चांगले काम करण्यास मी कटिबद्ध राहील. कार्यक्रमाप्रसंगी मा.सरपंच सुभाषराव कुटे, सदस्य बाजीराव कुटे,शालेय समिती अध्यक्ष अरुणजी शेटे , सदस्य योगेश सातपुते, गणेश वर्पे, जितेश साबळे,बाळासाहेब शिरसाठ, भारत शिंदे, सूर्यभान सातपुते,लहानभाऊ कुटे,बबन कुटे,नानासाहेब सातपुते, एकनाथ कुटे,गायकवाड सर,पोपट सातपुते,अजित सातपुते,भारत सातपुते,केशव सातपुते,सतीश सातपुते,चैतन्य सातपुते,सचिन साबळे,गौरव वर्पे,मोहन घोटेकर,सागर सातपुते,मंगेश सातपुते,हरिभाऊ दिघे,सोमनाथ दिघे,किशोर गुंजाळ,फिटर सुनील दिघे,जयदीप लंके,संकेत फटांगरे,सुदर्शन शिंदे , गणेश कानवडे,राजू सातपुते, महिला वर्ग व बालमित्र मोठयासंख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी अभिजित सातपुते,राहुल हिरे,सचिन गुंजाळ,निलेश आभाळे, आदिक साबळे,राहुल कुटे ,सौरभ काकडे, विकास पानसरे,राजीव भोसले आदी.विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भारत पडवळ यांनी केले.मान्यवरांचे आभार शुकलेश्वर विद्यालयाचे शिक्षक श्री.सुभाष गायकवाड सर यांनी मानले.

0 टिप्पण्या