कळंब प्रतिनिधी : अखिल भारतीय क्रांतीसेनेची उस्मानाबाद जिल्हा कार्यकारीणी बैठक आज कळंब येथील संत ज्ञानेश्वर अनाथ बालक आश्रम येथे अखिल भारतीय क्रांतीसेना प्रदेश सरचिटणीस नितीन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष मनोहर निकम, पैठण तालुका अध्यक्ष लक्ष्मण शेलार या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत व मराठवाडा संघटक मोहन सोनटक्के सर,मराठवाडा कार्याध्यक्ष किरण म्हेत्रे, अमोल अण्णा शेळके, दिपक भालेकर अशोक काळे, कौस्तुभ शिंदे, महादेव महाराज आडसुळ, सुनील पवार, सागर सोनवणे व असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
यावेळी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. बैठकीत अ.भा. क्रांतीसेनेचा जाहिरनामा, विधानसभा निवडणूक, उस्मानाबाद जिल्ह्यातील संघटना वाढीबाबत, आंदोलने इ.विषयांवर सखोल चर्चा झाली,तसेच नविन पदाधीकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान करणात आले.
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुका अध्यक्षपदी अमोल अण्णा शेळके, उस्मानाबाद तालुका अध्यक्षपदी दिपक भालेकर, तुळजापूर तालुका अध्यक्षपदी अमोल सगट यांच्या नियुक्त्या करून नियुक्ती पत्र देण्यात आले.



0 टिप्पण्या