पैठण/ प्रतिनिधी : प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्याकडे क्रांतीसेनेने निवेदनाद्वारे केली आहे.
निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी कीर्तनाच्या माध्यमातून मागील जवळपास २५ वर्षापासून महाराष्ट्र राज्यात प्रबोधनाची चळवळ चालविली आहे.आज पर्यंत त्यांनी लाखो कीर्तन केले आहे.त्यांचे कीर्तन नुसतेच आध्यात्मिक नसुन त्या माध्यमातून त्यांनी हुंडाबळी,शेती,समाज परिवर्तन, दारूबंदी, भ्रष्टाचार, बालविवाह, अंधश्रद्धा, बुवाबाजी यासह अनेक अनिष्ट रूढी,परंपरा व चालीरीती इत्यादींवर मोठ्या प्रमाणात प्रबोधन केले आहे.त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून आजवर महाराष्ट्रातील तरूण पिढी जि कधीच कीर्तन अथवा अध्यात्माकडे वळत नव्हती ,ती तरुण पिढी,अबाल वृध्द आज त्यांच्या प्रबोधनामुळे अध्यात्माकडे डोळसपणे बघत आहे.त्यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहतात.त्यांच्या कीर्तनामुळे आज मोठ्या प्रमाणात ग्रामीण समाजात परिवर्तन घडवून आलेआहे.निवृत्ती महाराज इंदोरीकर हे नुसतेच कीर्तनातून प्रबोधन करत नसुन ते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण संस्था ही चालवतात.त्याच बरोबर वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार व्हावा म्हणुन वारकरी शिक्षण संस्था ही चालवतात.तसेच गोशाला ही त्यांनी सुरू केल्या आहेत.
वरील सर्व बाबींचा विचार करून निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील, ग्रामीण भागातील शेतकर्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठीचे योगदान अनन्यसाधारण आहे,अशा त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान करण्यासाठी त्यांना यंदाचा महाराष्ट्र भुषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे,अशी मागणी अखिल भारतीय क्रांतीसेना पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख संतोष तांबे पाटील, सरचिटणीस नितीन देशमुख यांनी केली आहे.

0 टिप्पण्या