राहुरी/ प्रतिनिधी : अखिल भारतीय क्रांतीसेना पक्षाच्या प्रदेश संपर्क प्रमुख पदी मधुकर म्हसे यांची राहुरी येथे झालेल्या बैठकीत सर्वांनुमते निवड करण्यात आली.
अखिल भारतीय क्रांतीसेनेची अहमदनगर जिल्हा कार्यकारीणी बैठक राहुरी येथे पक्षाचे सरचिटणीस नितीन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे, शिक्षक क्रांतीसेना अध्यक्ष भागचंद औताडे, किसान क्रांतीसेना अध्यक्ष सुभाष चाटे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष संदीप ओहोळ, संघटक जालिंदर शेडगे, औरंगाबाद जिल्हा संपर्कप्रमुख साईनाथ कासोळे आदींच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. अ.भा.क्रांतीसेना पक्षाचे सरचिटणीस नितीन देशमुख यांनी यावेळी बोलताना सांगितले की, येणाऱ्या काळात अखिल भारतीय क्रांतीसेना दारुमुक्त गाव आणी शेतकऱ्यांना हमीभाव या मागण्यासाठी महारॅली काढणार आहे.यावेळी भागचंद औताडे, मधुकर म्हसे, सुभाष चाटे, संदीप ओहोळ आदींनी बैठकीत मार्गदर्शन केले. यावेळी अँड.अमोल धोंडे यांची अहमदनगर बार असोसिएशनच्या सचिवपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा नितिन देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, तसेच आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत राहुरी तालुका पदाधिकारी यांनी केले.बैठकीत विधानसभा निवडणूक, जिल्ह्यातील संघटना वाढीबाबत, शेतकऱ्यांच्या, विद्यार्थी, युवकांच्या प्रश्नासाठी आंदोलने उभारण्याच्या सुचना करण्यात आल्या,आदी विषयांवर सखोल चर्चा झाली, तसेच नविन पदाधीकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी अ.भा.क्रांतीसेना पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी संदीप ओहोळ (राहुरी), पश्चिम महाराष्ट्र संघटकपदी जालिंदर शेडगे (राहुरी), पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुखपदी बाबासाहेब चेडे (श्रीरामपूर), पश्चिम महाराष्ट्र शिक्षक क्रांतीसेना अध्यक्षपदी रंगनाथ माने (श्रीरामपूर), दक्षिण नगर जिल्हाध्यक्षपदी सुभाष दरेकर (श्रीगोंदा), उत्तर नगर जिल्हाध्यक्षपदी नवनाथ ढगे (राहुरी), उत्तर नगर युवा जिल्हाध्यक्षपदी युवराज सातपुते (संगमनेर), युवा उपाध्यक्षपदी शेखर नरसिंह पवार (राहुरी), पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया प्रमुखपदी अक्षय मांडगे (कर्जत), दक्षिण नगर सोशल मीडिया प्रमुखपदी स्वप्निल एकड (कर्जत), कर्जत तालुकाध्यक्ष पदी गोकुळ नेटके, राहुरी तालुका अध्यक्षपदी संदीप उंडे, राहुरी तालुका उपाध्यक्षपदी सचिन गागरे, युवा तालुका अध्यक्षपदी शाम कदम, राहुरी युवा शहराध्यक्षपदी संतोष मेहेत्रे, विद्यार्थी तालुका अध्यक्षपदी सोमनाथ वने आदींच्या नियुक्त्या करण्यात आल्या तसेच सुनिल कोल्हे,निलेश दिघे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


0 टिप्पण्या