अखिल भारतीय क्रांतीसेनेची जिल्हा कार्यकारीणी बैठक सोलापुरात संपन्न

सोलापूर प्रतिनिधी : अखिल भारतीय क्रांतीसेनेची सोलापूर जिल्हा कार्यकारीणी  बैठक आज हॉटेल पांचाली येथे अखिल भारतीय क्रांतीसेना प्रदेश सरचिटणीस नितीन देशमुख यांच्या अध्यक्षतेखालीप्रदेश संघटक शहाजी कोळपे,किसान क्रांतीसेना प्रदेश संघटक प्रतापसिंह पाटील,महेश शिंदे,औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष मनोहर निकम,पैठण तालुका अध्यक्ष लक्ष्मण शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

      या बैठकीत अ.भा. क्रांतीसेनेचा जाहिरनामा,विधानसभा निवडणूक,सोलापूर जिल्हा संघटन वाढीबाबत,आंदोलने आदी विषयांवर सखोल चर्चा झाली.यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांना प्रदेश सरचिटणीस नितीन देशमुख यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.अखिल भारतीय किसान क्रांतीसेना सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी श्रीगणेश पाटील,पंढरपूर तालुका अध्यक्षपदी सदाशिव शिंदे ,दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्षपदी सुनिल पाटील,मोहोळ तालुका अध्यक्षपदी अविराज कोळी,मोहोळ तालुका उपाध्यक्षपदी शुभम गोरे,टेंभुर्णी शहर अध्यक्षपदी नवनाथ यादव आदींच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या