अखिल भारतीय क्रांतीसेना पक्षाच्या हिंगोली जिल्हा अध्यक्षपदी शिवाजीराव गडदे


       हिंगोली येथील शासकीय विश्रामगृह येथे अखिल भारतीय क्रांतीसेना पक्षाच्या जिल्हा पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अ.भा.क्रांतीसेनेचे अध्यक्ष संतोष तांबे व मराठवाडा अध्यक्ष रघुनाथ भोसले, मराठवाडा संपर्क प्रमुख राजीव पवणकर आदींच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

       हिंगोली जिल्ह्यातील कार्यकात्यांनी अखिल भारतीय क्रांतीसेना पक्षाचे अध्यक्ष संतोष तांबे, रघुनाथ भोसले,राजीव पवणकर, साईनाथ कासोळे, मनोहर निकम व लक्ष्मण शेलार आदींचा भव्य सत्कार केला.

        यावेळी अखिल भारतीय क्रांतीसेना हिंगोली जिल्हा प्रमुखपदी शिवाजी विठ्ठलराव गडदे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच हिंगोली जिल्हा सल्लागार श्याम सर पडोळे, उपजिल्हाध्यक्षपदी संतोष मस्के,औंढा तालुका अध्यक्षपदी संदीप राठोड, युवक जिल्हाध्यक्षपदी शंकर श्रीरामे, कळमनुरी तालुका अध्यक्षपदी सतीश सोनकर, शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्षपदी रमेश पंडित, किसान क्रांती सेना जिल्हाध्यक्षपदी राजू पाटील गौळकर,किसान क्रांती सेना उपजिल्हाध्यक्षपदी संतोष नरवाडे पाटील आदी कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या अखिल भारतीय क्रांतीसेना पक्षाचे अध्यक्ष संतोष तांबे यांच्या हस्ते करण्यात आल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या