अखिल भारतीय क्रांतीसेना पक्षाच्या परभणी जिल्हा अध्यक्षपदी गोविंदराज इक्कर पाटील


परभणी/प्रतिनिधी : येथील सावली विश्रामगृह येथे अखिल भारतीय क्रांतीसेना पक्षाचे अध्यक्ष संतोष पाटील तांबे यांच्या अध्यक्षतेखाली व मराठवाडा अध्यक्ष रघुनाथ भोसले पाटील यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती.

     या बैठकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.बैठकीत पक्षाचे ध्येय, धोरणे व संघटन वाढीवर चर्चा करण्यात आली.येणार्या विधानसभा निवडणुकीत अखिल भारतीय क्रांतीसेना पक्ष परभणीत निवडणूक लढवणार असल्याचे यावेळी एकमताने ठरले.तसेच या बैठकीत पदाधिकारी निवडी करून नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.परभणी जिल्हाअध्यक्षपदी गोविंदराज इक्कर पाटील, जितुर  तालुका अध्यक्षपदी रामेश्वर मुंडे, परभणी तालुका अध्यक्षपदी राजेंद्र जोंधळे,परभणी शहर प्रमुखपदी राहुल काटकर, युवा जिल्हा अध्यक्षपदी चापके पाटील आदींची निवड करण्यात आली.

    यावेळी साईनाथ कासोळे, मनोहर निकम,लक्ष्मण शेलार,राहुल वाघचौडे पाटील,राजु जोधले,नरेंद्र जोशी,भैय्या पाठव,रचिन नखाते,प्रसाद रीठे, अविनाश वेदपाठक, राम मुढे, संजुभाऊ खाडे, रवि कांबळे, दिगाबंर सावंत, आशिष निंबाळकर, अभिजीत कुलकर्णी, सुनील अद्भुत, राहुल काटकर, ज्ञानेश्वर इककर पाटील, सदीप उनाले, संतोष लुबाळे,गोपाळ सेनभगत, बाळु डोंगरे, सुरेश यादव ,पिटू आदरट ,धंमा सोनकाबंळे, प्रभाकर सोळंके, सुरज भोसले, नागेश थोरात, राम चापके, कुनाल करडे, पंकज सोनवणे,भरत हराले, रोहन चौधरी,राहुल भोसले, गोविंद भरोसे,सतीश काळे मारोती पावडे,संजय जाधव,मुकुंद इककर,गोपाळ इककर आजय वाघमारे, रोहित कहात, अक्षय निरस आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या