जिल्हा परिषद प्रशासनाविरुद्ध क्रांतीसेना करणार प्रतिकात्मक दिंडी आंदोलन -नितीन देशमुख


औरंगाबाद : महाराष्ट्राला हजारो वर्षांची दिंडीची परंपरा आहे.गेली शेकडो वर्षे महाराष्ट्रातील शेतकरी बहुजन समाज आषाढी एकादशीला पांडुरंगाच्या चरणी लीन होण्यासाठी मोठ्या भक्ती भावाने चिखल पावसाचा विचार न करता पंढरपूरच्या दिशेने ग्यानबा तुकारामांचा जयघोष करत दिंडी मधून जात असतो.
     औरंगाबाद जिल्ह्यातून ही हजारो वारकरी मोठ्या उत्साहाने जवळपास 40 ते 50 छोट्या मोठ्या दिंड्यांच्या माध्यमातून पंढरपूर कडे प्रस्थान करत असतात.दरवर्षी औरंगाबाद जिल्हा परिषदेच्यावतीने वारकऱ्यांचे रस्त्याने पाण्याचे हाल होऊ नये म्हणून टँकरच्या माध्यमातून मुबलक प्रमाणात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाते .या दिंड्यांच्या सोयीसाठी  टँकर च्या निधीची तरतूद मागील वर्षी 15 लाख रुपये होती व वारकऱ्यांचे आरोग्य ,रुग्णवाहिका,आरोग्य पथक,औषधे इत्यादी साठी मागील वर्षी 10 लक्ष रुपयांची तरतूद होती.परंतु या वर्षीच्या अर्थ संकल्पात टँकर साठीची तरतूद फक्त 1000 रु.(एक हजार रुपये)व औषधे,रुग्णवाहिका,आरोग्य पथक, इत्यादींच्या खर्चासाठी फक्त 1000 रु (एक हजार रुपये)ची तरतूद करण्यात आली आहे.म्हणजे हजारो लोकांचा खर्च आमची जिल्हा परिषद फक्त 2000 रुपयांमध्ये भागवणार .आमचा वारकरी,शेतकरी विठुरायाच्या दर्शनासाठी तुमच्या आमच्यावर अथवा जिल्हा परिषद प्रशासनावर विसंबून राहत नाही, तो बिचारा विठोबाच्या भक्तीत बेभान होऊन काट्या कुट्याचा रस्ता तुडवत पंढरपूरच्या दिशेने चालत असतो,अशावेळी जिल्हा परिषदेची ही नैतिक जवाबदारी आहे की,या वारकऱ्यांना मुबलक सुविधा उपलब्ध करून द्याव्या परंतु त्यांचा प्रवास सुखकर करण्याऐवजी त्यांच्या अत्यंत गरजेचे सुविधांच्या खर्चावर  कात्री लावत आहे, आणि एकीकडे यांच्या बैठका,प्रवास ,सेमिनार,गाड्या,यावर जनतेचे करोडो रुपये उडवत असतात,तेव्हा का नाही हे काटकसर करत.
जिल्हा परिषदेच्या या  तुघलकी निर्णयाच्या विरोधात आज क्रांतिसेनेच्या वतीने अतिरिक्त उपमुख्यकार्यकारी अधिकारी अशोक शिरसे साहेब यांना निवेदन देण्यात आले व सांगण्यात आले की, खर्चाची कमी केलेली तरतूद तातडीने दोन दिवसात मागील वर्षीप्रमाणे करावी.जर दोन दिवसात मागील वर्षीप्रमाणे निधीची तरतूद न केल्यास क्रांतीसेनेच्या वतीने  जिल्हा परिषद प्रशासनाविरुद्ध प्रतिकात्मक दिंडी आंदोलन करण्यांत येईल,असा इशारा देण्यात आला.
    या निवेदनावर क्रांती सेनेचे प्रदेश सरचिटणीस नितीन देशमुख,शहर जिल्हा अध्यक्ष मनोहर निकम पाटील,जिल्हा संपर्कप्रमुख साईनाथ कासोळे,वाळूज महानगर अध्यक्ष दिनेश दूधाट, युवा वाळूज महानगर अध्यक्ष औदुंबर देवडकर,वाळूज महानगर  उपाध्यक्ष दीपक गायकवाड,जिल्हा संघटक राजू शेरे पाटील, जिल्हा उपाध्यक्ष किशोर गोरे पाटील,विद्यार्थी आघाडी शहर अध्यक्ष वैभव पवार आदींच्या स्वाक्षरी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या