रस्त्यासाठी शेतकऱ्यांच्या अन्नत्याग आंदोलनाला क्रांतिसेनेचा सक्रिय पाठिंबा

अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देताना क्रांतीसेना प्रदेश सरचिटणीस नितीन देशमुख,राजु शेरे आदी...

औरंगाबाद : अहमदनगर औरंगाबाद प्रादेशिक राज्य मार्ग 5 भेंडाळा गळनिंब धनगरपट्टी ता. गंगापूर  रस्ता होण्यासाठी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब शेळके व त्यांचे इतर सहकारी हे 1 जून 19 पासून अगरवाडगाव ता.गंगापूर जि.औरंगाबाद येथे अन्नत्याग आंदोलनास बसले आहेत.ह्या रस्त्याची वर्क ऑर्डर निघालेली असताना सुद्धा अधिकाऱ्यांनी संगनमत करून हा रस्ता दुसरीकडे वळवला व शासनाची सुद्धा फसवणूक केली, अधिकाऱ्यांच्या ह्या कृतीने जवळपास 20 हजार नागरिकांना ह्याचा फटका सहन करावा लागणार आहे,पण तरी ही शासन या न्याय मागणीकडे दुर्लक्ष करत आहे .आज अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस आहे भाऊसाहेब शेळके यांची प्रकृती खालावत चालली आहे,शासनाने तातडीने रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी व शेतकऱ्यांच्या आंदोलनाची सांगता करावी अन्यथा याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.यावेळी क्रांतीसेनेने आंदोलन स्थळी  शेळके यांची भेट घेत त्यांना सक्रिय पाठिंबा दिला तसेच यावेळी उपस्थित असलेले गंगापूरचे नायब तहसीलदार श्री तेजीनकर यांनाही निवेदन देण्यात आले.उद्या जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांना भेटून लक्ष घालण्याबाबत विनंती करण्यात येणार आहे.
       यावेळी क्रांतिसेनेचे प्रदेश सरचिटणीस नितीन देशमुख,वाळूज महानगर संघटक राजू शेरे पाटील,किशोर गायकवाड इत्यादी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या