क्रांतीसेना व बोधराज भक्ती मंडळातर्फे बंकलगीत मोफत पाणी पुरवठा उपक्रम.



सोलापूर ( बंकलगी) : सर्वच ठिकाणी दुष्काळामुळे पाणीची भीषण टंचाई निर्माण झाली आहे.यात बंकलगीतही अपवाद नाही.त्यामुळे सामाजीक कर्तव्यच्या भावनेतुन कायम नवे समाजोपयोगी कार्य करणारे  व क्रांतीसेना व बोधराज भक्ती मंडळातर्फे सुनिल भाऊ देशमुख व दिपकआबा पाटील या युवकांनी मोफत पाणीपुरवठा स्वखर्चाने सुरु केला आहे.

       दुष्काळी परीस्थीतीमुळे गावात पाणीसाठी दिवसभर महीलांची ,मुलांची ससेहोलपट चालु आहे. ते पाहुन या दोघा युवकांनी आपण पुढाकार घेऊन काहीतरी केले पाहीजे,या भावनेतुन सुरुवातीला दोन पाणी टाकी बसवुन रोज पिण्याचे पाणी पुरवठा करण्यास चालु केले.पाऊस नसल्याने पाणी पातळी खालावल्याने गावातील विहीरी, बोअर यांचे पाणी कमी झाले.आपणच प्रत्यकाने काहीतरी प्रयत्न करुन पाणी प्रश्न सोडवले पाहीजे.त्याची या दोघांनी सुरुवात केली आहे.असे सुनिलभाऊ व दीपकआबा पाटील यांनी सांगीतले.

      पाणीपोई शुभारंभाला बोधराज महीला मंडळ सदस्य वसुंधरा पाटील,ऊज्वला देशमुख,कमळा बनसोडै,शोभा शिंगे,अश्वीनी पवार,वंदना घाटगे,जैना नदाफ,राधा देशमुख,मंगल देशमुख,पद्मीनी देशमुख,श्रावणी पवार हजर होते.मोलाचे सहकार्य सौ वसुधा अविनाश पोळ यांचे झाले.
टाकी पुजा शिशुपाल देशमुख गुलाब पाटील यांचे हस्ते केली.पोलिसपाटील विश्वनाथ माने,रेवनु चडचणै,संगण्णा कोणदे,रमेश पाटील,अशोक देशमुख,पै.बाळासाहेब देशमुख,राजु दशवंत,सुतार गूरुजी,जगदीश देशमुख,हरीबा
देशमुख,संतोष पवार,तानाजी पाटील,सागर घाटगे,मल्लु फुलारी,सचिन शिंदे अविनाश शिंदे,अमोल बनसोडै,अप्पा देशमुख हजर होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या