श्रीगोंदा : संजीव भोर हे शेतकरी हितासाठी, सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढा देत असतात. तसेच ते सामान्य शेतकरी कुटुंबातील असल्याने क्रांतीसेनेने दक्षिण नगर लोकसभेत अपक्ष उमेदवार संजीव भोर यांना पाठिंबा दिला आहे.
या पाठिंब्याच्या पत्रात क्रांतीसेनेचे अध्यक्ष संतोष तांबे सर, प्रदेश सरचिटणीस नितीन देशमुख, प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे, शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सुभाष चाटे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष संदीप ओहोळ, पश्चिम महाराष्ट्र संघटक जालिंदर शेडगे, दक्षिण नगर अध्यक्ष सुभाष दरेकर, उत्तर नगर अध्यक्ष नवनाथ ढगे, उपाध्यक्ष अविनाश कुरूमकर, श्रीगोंदा तालुका अध्यक्ष संदीप डेबरे,अक्षय मांडगे,शब्बीर शेख, विकास म्हस्के, योगेश वडणे, संदीप उंडे,शाम कदम, दत्ता काकडे, सुनिल धांडे, गोकुळ नेटके, बापुसाहेब विधाटे,प्रशांत साबळे,शहादेव मिसाळ, संदीप बटुळे, पप्पु देशमुख,दादा दांडे , दादा वने, सोमनाथ वने, दिपक झावरे आदींची नावे आहेत.
यावेळी पाठिंब्याचे पत्र देताना दक्षिण नगर जिल्हाध्यक्ष सुभाष दरेकर, श्रीगोंदा तालुका अध्यक्ष संदीप डेबरे, युवक अध्यक्ष विकास म्हस्के, दिपक माेटे,युवराज माेटे,आबासाहेब माेरे,सागर शिंदे,संदिप इधाटे ,याेगेश सावंत,नितीन सावंत ,अजित जराड व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.


0 टिप्पण्या