१० एप्रिल ला शेतकरी मोर्चा


संभाजीनगर : दिनांक 10 एप्रिल 19 रोजी निघणाऱ्या मोर्चाच्या तयारी निमित्ताने  सिटू चे राज्य उपाध्यक्ष उद्धव भवलकर यांच्या नेतृत्वाखाली आज गंगापूर तालुक्यातील खोजेवाडी, नांदेडा, एकलेहरा,आंबेलोहळ, गाजगाव,घाणेगाव, विटावा,रांजणगाव पोळ,डोमेगाव,तुर्कांबाद खराडी, इत्यादी गावांचा दौरा करण्यात आला.शेतकऱ्यांच्या बांदावर जात शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यात आल्या.शेतकऱ्यांची होत असलेली होरपळ थांबली पाहिजे,बळीराजा सुखी झाला पाहिजे या साठी संघटित होऊन आरपारची लढाई करण्याची निर्धार करण्यात आला.या दौऱ्यातील विविध गावामध्ये क्रांती सेनेचे प्रदेश सरचिटणीस नितीन देशमुख यांनी संबोधित केले.आजच्या दौऱ्याचा समारोप तुर्कांबाद खराडी येथे सभा घेऊन करण्यात आला.यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने मोर्चाला उपस्थित राहण्याचा निर्धार केला.तसेच आंबेलोहळ येथील तरुण विध्यार्थी मित्रांशी दुष्काळाच्या प्रश्नावर संवाद साधण्यात आला.

आजच्या दौऱ्यामध्ये क्रांती सेनेचे प्रदेश सरचिटणीस नितीन देशमुख,मनोहर निकम,सिटू चे नागनाथ बडे,शंकर ननुरे,गवळी,ठोंबरे,भाऊसाहेब नागे,कल्याण राऊत,पवन वाहुळ, इत्यादी पदाधिकारी सहभागी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या