लोकसभेच्या रिंगणात क्रांती सेना


राहुरी प्रतिनिधी : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील मुळा अतिथीगृहा मध्ये प्रदेश अध्यक्ष प्रा. संतोष तांबे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेश सरचिटणीस नितीन देशमुख, प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे, शिक्षक आघाडीचे अध्यक्ष भागचंद औताडे, शेतकरी आघाडीचे अध्यक्ष प्रतापसिंह पाटील, कार्याध्यक्ष सुभाष चाटे यांच्या उपस्थितीत क्रांतीसेना बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
    या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी व अहमदनगर जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.या निवडणुकांमध्ये शेतकरी, कामगार, बेरोजगारी,मराठा आरक्षण,स्वामिनाथन आयोग व इतर प्रश्नांना घेऊन क्रांती सेना संपुर्ण ताकदीने लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष प्रा. संतोष तांबे यांनी यावेळी सांगितले. या वेळी अहमदनगर जिल्हा कार्यकारिणी गठित करताना दक्षिण अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पदी सुभाष दरेकर, उत्तर अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पदी नवनाथ ढगे, अल्पसंख्याक उत्तर जिल्हा अध्यक्ष सद्दाम शेख, युवक उपाध्यक्ष शेखर पवार, उत्तर जिल्हा उपाध्यक्ष अजय जनवेजा, दक्षिण नगर सरचिटणीस गोकुळ नेटके, दक्षिण जिल्हा कार्याध्यक्ष बापुसाहेब विधाते, पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया प्रमुख अक्षय मांडगे, सोशल मीडिया नगर जिल्हा अध्यक्ष स्वप्नील एंकाड, राहुरी तालुका अध्यक्ष संदीप उंडे,कर्जत तालुकाध्यक्ष सुनिल धांडे, श्रीरामपुर तालुकाध्यक्ष सलीम शेख, राहुरी तालुका उपाध्यक्ष सचिन गागरे, अल्पसंख्याक राहुरी तालुका अध्यक्ष शाकिब शेख, राहुरी विद्यार्थी अध्यक्ष सोमनाथ वने आदींच्या यावेळी नियुक्त्या करण्यात आल्या.तसेच लोकसभा निवडणुकीसाठी क्रांती सेनेचे मतदार संघ निहाय उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली.या मध्ये दक्षिण अहमदनगर सुभाष दरेकर, शिर्डी  संदीप ओहोळ, नाशिक दत्तात्रय तांबे, डॉ सुप्रिया कुलथे, कोल्हापूर प्रतापसिंह पाटील, डॉ निवृत्ती पाटील, हातकणंगले अभिनंदन चौगुले,सांगली उत्तमराव ढोले,माढा शहाजी कोळपे,जालना रामभाऊ उनगे, विठ्ठल कडवने,परभणी रघुनाथ भोसले, गोविंद इक्कर हिंगोली राजीव पवणकर, उस्मानाबाद किरण म्हेत्रे, धुळे संदीप सोनवणे, नंदुरबार नंदलाल वसईकर,पुणे सचिन सुंबे, रायगड डॉ संतोष पाटील, रत्नागिरी ज्योतीराम खोत आदींचे नावे यावेळी जाहीर करण्यात आले.

यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य अरूण थोरात, औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष मनोहर निकम, संपर्क प्रमुख साईनाथ कासोळे,डिग्रस ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर भिंगारदे, योगेश भिंगारदे, गोरक्षनाथ देशमुख, किरण पटारे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालण मधुकर म्हसे तर आभार प्रदर्शन संदीप ओहोळ यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या