हिंगोली जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृह येथे क्रांतीसेना हिंगोली जिल्हा कार्यकारिणी गठीत करण्यात आली.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी क्रांती सेना हिंगोली सल्लागार गोपालराव ढोणे व शेतकरी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष राजीव पवणकर हे होते.या वेळी हिंगोली जिल्हा अध्यक्ष पदी शिवाजीराव विठ्ठलराव गडदे, जिल्हा संघटक पदी परवेश शिंदे ,औंढा तालुका अध्यक्ष पदी संदीप राठोड व हिंगोली तालुका अध्यक्ष पदी संजय कांबळे आदी पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
नवनिर्वाचित पदाधिकारी यांना क्रांतीसेनेच्या संस्थापिका शालिनीताई पाटील, प्रदेश अध्यक्ष संतोष तांबे, प्रदेश सरचिटणीस नितीन देशमुख, प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे, शेतकरी आघाडीचे अध्यक्ष प्रतापसिंह पाटील, कार्याध्यक्ष सुभाष चाटे, संघटक शहाजी कोळपे, मराठवाडा अध्यक्ष रघुनाथ भोसले, कृष्णा सावंत आदींनी शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले.

0 टिप्पण्या