क्रांतीसेना रिक्षा चालक मालक युनियनची स्थापना


संभाजीनगर : आज दिनांक 28 फेब्रुवारी 19 रोजी सायंकाळी क्रांतीसेना रिक्षा चालक मालक युनियनची स्थापना करण्यात आली.यावेळी युनियनच्या स्टिकर चे विमोचन करण्यात आले.औरंगाबाद शहरामध्ये जवळपास 20 हजार रिक्षा चालक मालक,शहरवासीयांना सेवा देत आहेत,परंतु रिक्षा चालकांचे प्रश्न अत्यंत गंभीर बनले आहेत.याकडे कोणाचे ही लक्ष नाही,जागतिक करण्याच्या रेट्यामध्ये अनेक आंतराष्ट्रीय कंपन्या शहर प्रवासी सेवेमध्ये उतरल्या आहेत,आशा कंपन्यांना शासनकर्ते ही बिनदिक्कत परवानग्या देत आहेत,परंतु आपल्याला अगदी गल्ली पासून सेवा देणारा आपला रिक्षा चालक मालक बांधव त्याचे दैनंदिन घर  देखील चालवू शकत नाही अशी मोठी गंभीर समस्या निर्माण झाली आहे.या रिक्षा चालकांच्या प्रश्नांना हात घालण्यास कोणीही तयार नाही. अशा वेळी या रिक्षा चालकांच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी क्रांतीसेनेने पुढाकार घेण्याचा निर्धार केला आहे .म्हणूनच आज औरंगाबाद मधील जय भवानी नगर येथे क्रांतीसेना सरचिटणीस नितीन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली  रिक्षा चालक मालक यांची बैठक घेऊन क्रांती सेना रिक्षा चालक मालक युनियनची स्थापना करण्यात आली.
       या कार्यक्रमासाठी क्रांती सेनेचे शहर जिल्हा अध्यक्ष मनोहर निकम पाटील यांनी पुढाकार घेतला.यावेळी युनियनचे शहर अध्यक्ष म्हणून अंबादास आडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली,व त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.रिक्षा चालकांना जाणीवपूर्वक  त्रास देणाऱ्या पोलीस,आर टी ओ, मनपा,या विरुद्ध संघर्ष करण्याचा संकल्प करण्यात आला.तसेच रिक्षा चालकांची घरकुल योजना,पतसंस्था,आरोग्य विमा ,रिक्षा चालकमालकांचे महामंडळ,पाल्यांसाठी शिक्षणात सवलत,इत्यादी अत्यंत महत्वाच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी शासनस्तरावर संघटित होऊन लढा देण्याचे ठरले.

       या कार्यक्रमासाठी सुनील पवार,राजू राठोड,भरत आढाव,रवी गायकवाड,मिनींनाथ चिडे,अमोल गायकवाड,शक्ती राठोड,विलास आढे, बळीराम चव्हाण,संदीप,अजय सानप,शिवा चौधरी,मदन टेलर,संतोष जाधव,बाळू जाधव,सागर सुलताने, अविनाश चव्हाण,विलास जाधव,राजू मोरे,किरण राजपूत,हिरा चव्हाण,अनिल राठोड,अनिल चव्हाण,प्रवीण पवार,अनिल पवार,सोनू पवार,बापू गवळी,योगेश पाटील,अमोल एडके,इत्यादी पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. क्रांतिसेना या नावात क्रांती आहे, रिक्षा चालक आणि मालक यांच्या अनेक अडचणी सोडविण्याचा घेतलेला आपला हा क्रांतिकारी निर्णय शासनाला आणि प्रशासनाला यांचे जीवनमरणाचे गंभीर बनत चाललेले प्रश्न सोडविण्यात भाग पडतील यात शंका नाही. संघटित होत रहा, संघर्ष करत राहू हमखास यश लाभेल! नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन!

    उत्तर द्याहटवा