माढा : येथील विश्राम गृह येथे क्रांतीसेना महाराष्ट्र सोलापूर जिल्हा पदाधिकारी आढावा बैठक प्रदेश सरचिटणीस नितीन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणुन क्रांतीसेना शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रतापसिंह पाटील,कार्याध्यक्ष सुभाष चाटे,
क्रांतीसेना राज्य संपर्क प्रमुख मधुकर म्हसे , प्रदेश संघटक शहाजी कोळपे, औरंगाबाद जिल्हा प्रमुख मनोहर निकम, सल्लागार नवनाथ वाघ ,सोलापुर जिल्हा अध्यक्ष दीपकआबा पाटील व युवक अध्यक्ष गणेश चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांना विषयवार सखोल मार्गदर्शन व त्यांच्या शंकांचे निरसन केले.शेतकरी अडीअडचणी सोडवणे,पीक हमीभावासंबंधी सरकारला जाणीव करुन देणे, ""गाव तेथे क्रांतीसेना शाखा "" स्थापना करण्याचे ठरले.संघटना बांधणी ,त्याची वाटचाली संबंधीबद्दल ,कार्यकर्तेचे कार्य,आदी संबधी मा.नितीन देशमुख यांनी मार्गदर्शन केले. लोकसभा व विधानसभा क्रांतीसेना पक्ष लढवणार असल्याचे यावेळी नितीन देशमुख यांनी सांगितले.
बैठकीला महेश शिंदे,सरचिटणीस गणेश पाटील,जिल्हा संघटक प्रितम जगदाळे,माढा संघटक गौतम शिंदे व कार्यकर्ते उपस्थीत होते. सोलापुर क्रांतीसेना जिल्हा कमीटीतर्फे मान्यवरांचे स्वागत दिपक आबा पाटील व प्रितम जगदाळे यांनी अाभार मानले.


0 टिप्पण्या