शिव जन्मोत्सवानिमित्त क्रांती सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य लाडु वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाचे उद्घाटन समाजसेवक कपीलजी कोठारी साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्याच्या माजी राज्यमंत्री फौजीया खान मॅडम, आमदार डाॅ राहुलजी पाटील साहेब,आमदार रामरावजी वडकुते साहेब,शिवसेना जिल्हाप्रमुख विशालभाउ कदम,भाजप जिल्हाध्यक्ष रबदाडे मामा,भाजप महानगर अध्यक्ष आनंदरावजी भरोसे साहेब, राष्ट्रवादीच्या सोनालीताई देशमुख,युवासेना जिल्हाप्रमुख अजुर्णभाऊ सामाले पाटील,गंगाधर नाना जवजाळ, तसेच विविध पक्षाचे नगरसेवक,पदाधिकारी , सर्व संघटना मित्रमंडळ ,तसेच क्रांतीसेनेचे पदाधिकारी , कार्यकर्ते या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्रांतीसेनेचे मराठवाडा अध्यक्ष रघुनाथ भोसले पाटील, परभणी महानगराध्यक्ष गोविंदराव इक्कर पाटील, गणेश डुकरे, शिवाजी तोलमारे, स्वप्नील गरुड, भगवान ढगे, ज्ञानेश्वर शिंदे, निखिल अवजारे, गोविंद काळे, सुरज भोसले, पवन ठाकुर आदींनी परिश्रम घेतले.



0 टिप्पण्या