वाळुज महानगर/ प्रतिनिधी : स्वराज्य प्रतिष्ठान गेली अनेक वर्षे सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्य, कामगार, महिला इत्यादी क्षेत्रात कार्यरत आहे.प्रत्येक महापुरुषांचे विचार घरोघरी पोहचावे यासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने राबवण्यात आले आहे .
यावर्षी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने शिवचरित्र सर्वांपर्यंत पोहचावे,शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते,अनेक लोकाभिमुख योजना त्यांनी स्वराज्यामध्ये राबविल्या,शिवाजी महाराजांचा लढा हा कोणत्याही विशिष्ट धर्मा विरुद्ध नव्हता तर अन्याय करणाऱ्या विरुद्ध होता, शिवराय हे सर्व समाजाचे राजे होते, अठरापगड जातीचे लोक हे शिवरायांचे मावळे होते, म्हणून शिव चरित्राचा विचार सर्वांपर्यंत पोहचावा यासाठी आम्ही वाळूज महानगरात 25 हजार विद्यार्थ्यांचा शिवचरित्र वाचन सोहळा विविध शाळा , कॉलेज, संस्था मध्ये आयोजित करत आहोत. तसेच येणाऱ्या 19 फेब्रुवारी 2020 पर्यंत आम्ही जिल्ह्यातील 1,00,000(एक लाख ) व राज्यातील कमीत कमी 5,00,000(पाच लाख)विद्यार्थ्यांना व तरुणांना या शिवचरित्र वाचन सोहळ्यात सहभागी करून घेण्याचा संकल्प केला आहे. या शिव कार्यात सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन नितीन देशमुख यांनी केले आहे.
नितीन देशमुख
अध्यक्ष,
स्वराज्य प्रतिष्ठान.
सरचिटणीस
क्रांती सेना महाराष्ट्र.
9923555275

0 टिप्पण्या