अहमदनगर / प्रतिनिधी
विश्वशिवशाहिर डॉ विजय तनपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवगर्जना कला मंच आणि साईधाम हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने गाडगे महाराज आश्रम शाळा नगर मनमाड रोड राहुरी येथे मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन केले आहे अशी माहिती संयोजक समितीच्या वतीने दिली आहे.सामाजिक बांधिलकी च्या हेतूने व गोरगरिबांपर्यंत आरोग्य सेवा पुरविण्यासाठी शिवगर्जना कला मंच आणि साईधाम हॉस्पिटल राहुरी यांच्या सहकार्याने भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे , यामध्ये परीसरातील आलेल्या रुग्णांची तज्ञ डॉक्टर कडून तपासणी व उपचार करतील .जिल्ह्यातील डॉ स्वप्निल माने स्रीरोग व कर्करोग रोग तज्ञ,डॉ संदीप निमसे नेत्ररोग तज्ञ,डॉ सुवर्णा गोलेचा ,डॉ अनंत शेकोकार मुळव्याध तज्ञ,डॉ धनंजय वारे ह्रदयरोग तज्ञ,डॉ प्रविण कोरडे,डॉ निरंजन गांधी मुत्ररोग तज्ञ,डॉ प्रताप गिरगुणे अस्थिरोग तज्ञ,मनोज वैद्य,डॉ अभिजित शिरसाठ शिल्यचिकित्सक,डॉ कौस्तुभ भागवत स्रीरोग तज्ञ, डॉ संदीप म्हस्के या सर्व डॉक्टरांचा या मध्ये सहभाग असणार आहे. या शिबिरात औषधे मोफत वाटप करण्यात येणार आहे रुग्णांनी येताना मागील काही रीपोर्ट व फाइल घेऊन येणे म्हत्वाचे आहे जेणे करून गंभीर आजार असलेल्या रुग्णांची पुढील शस्त्रक्रिया साईधामा हॉस्पिटल राहुरी येथे केली जाणार आहे.
एका पायाने अधु असलेल्या शिवशाहीर डॉ. विजय महाराज तनपुरे यांनी अपंग, अनाथ, वृंध्दांसाठी शिवाश्रमची कल्पना साकारली. देश-विदेशात पार पडलेल्या आपल्या कार्यक्रमातून मिळणार्या मानधनातुन त्यांनी काही रक्कम बाजूला ठेवून ती या भव्य-दिव्य साकारणाऱ्या शिवाश्रमासाठी खर्च केली जाणार आहे या वर्षीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने येणाऱ्या व्यक्तीनी ही हार, तुरे ,फेटे ,बुके यावर खर्च नकरता जीकाही रक्कम आहे ती शिवाश्रम निर्मिती साठी द्यावी असे आवाहन संयोजन समितीने केले आहे.या मोफत सर्व रोग निदान शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक समितीचे डॉक्टर स्वप्निल माने यांनी केले.
0 टिप्पण्या