माजी आमदार डॉ शालिनीताई पाटील यांचा खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते होणार सत्कार

सातारा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी सर्वात आधि मागणी करणाऱ्या माजी आमदार डॉ.शालीनीताई पाटील, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष मा.आ.नरेंद्र पाटील व मंदाताई शिंदे यांचा २२ डिसेंबर रोजी सातारारोड येथे खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती अ‍ॅड. वसंतराव फाळके यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अ‍ॅड. फाळके म्हणाले, मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिक दृष्या मागास आहे. हे लक्षात घेऊन या समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भूमिका घेऊन माजी आमदार डॉ. शालीनीताई पाटील यांनी विधान भवनामध्ये आवाज उठविला होता. सामान्य माणसाला ही भूमिका आवडली. मात्र, नेते मंडळींना ही भूमिका आवडली नाही. तसेच याला कोणीही पाठिंबा दिला नाही. त्यामुळे त्यांना आमदारकीच्या शेवटच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाहेर जाऊन क्रांती सेना संघटना उभी करावी लागली. त्यांच्या या भूमिकेमुळेच त्यांची आमदारकी गेली. पण तरीही त्या संघर्ष करीत राहिल्या. सध्या मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यावर तार्इंची सर्वांनाच आठवण आली. त्यातूनच त्यांच्या सत्काराची कल्पना पुढे आली. खासदार उदयनराजे भोसले यांनीही हा कार्यक्रम स्वीकारला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या