माझी समस्या उदयनराजेंना सांगणार, त्यांनी छत्रपतींसारखा निर्णय करावा!



मला जरंडेश्वर पुन्हा नावारुपाला आणायचा आहे. 

सातारा : शेतकऱ्यांच्या मालकीचा जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना गिळंकृत केल्याचा पुनरुच्चार करुन शालिनीताई पाटील यांनी अप्रत्यक्षरित्या अजित पवारांवर निशाणा साधला आहे.


शालिनीताई पाटील यांनी मोठ्या कष्टातून उभा केलेल्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याचा दहा वर्षांपुर्वी लिलाव झाला. त्यानंतर शालिनीताईंनी अजित पवारांवर टिकेची झोड उठवत न्यायालयीन लढाईही लढली, मात्र त्यांना अपयश आले. तसेच 2009 ला विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्या पराभवानंतर मुंबईत वास्तव्यास गेलेल्या शालिनीताई काल साताऱ्यात आल्या. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत 'जरंडेश्वर'चा विषय आला.

शालिनीताई म्हणाल्या, जरंडेश्वर कारखाना आणि डिस्टलरी या अनुषंगाने मी पत्रकार परिषदेत भाष्य करणार नाही. सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमातच मी त्यावर अधिक बोलणार आहे. उदयनराजेंना माझी समस्या आणि भूमिका सांगणार आहे. यावर मार्ग काढायचा असेल तर त्यांच्याशिवाय जवळचा दुसरा कोणताही मार्ग नाही. मला जरंडेश्वर पुन्हा नावारुपाला आणायचा आहे. 

तुम्ही पुन्हा एकदा या अनुषंगाने उदयनराजेंशी काही चर्चा करणार आहे का..?, असे विचारले असता 'जरंडेश्वरच्या अनुषंगाने त्यांनी छत्रपतींसारखे वागावे,' असे उत्तर त्यांनी दिले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या