सोलापूर : महाराष्ट्र मधील ओबीसीचे आरक्षण 10 टक्क्यानी कमी करावे, किंवा इतर मागासवर्गात (ओबीसीत) समस्त मराठा समाजाचा समावेश करावा, याबाबत राष्ट्रीय छावाचे जिल्हाध्यक्ष योगेश पवार यांनी मागासवर्ग आयोगाकडे तक्रार दाखल केली.
सन 1931 नंतर भारतामध्ये जातनिहाय जनगणना झालेली नाही, त्यामुळे सन 1931 च्या जनगणनेच्या आधारे, त्यावेळेची महाराष्ट्रातील वरील लोकसंख्या व टक्केवारी विचारात घेवून आरक्षण द्यावे. तसेच महाराष्ट्रात ओबीसीच्या लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा, ओबीसीना दिलेले ३२% आरक्षण जास्त असल्यामुळे, सदरील ओबीसी आरक्षणातून १०% आरक्षण कमी करावे, किंवा इतर मागासवर्गीय/ ओबीसीत समस्त मराठा समाजाचा समावेश करून मराठ्यांना राजकीय, सामाजिक व शैक्षणिक आरक्षण देण्याची मागणी जनगणनेचे पुरावे देत करण्यात आलेली आहे.
0 टिप्पण्या