क्रांतीसेना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदी डॉ पाटील

कोल्हापूर : संभापुर ता. हातकणंगले,जि. कोल्हापूर येथे क्रांती सेना पदाधिकारी यांची बैठक शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रतापसिंह पाटील व सांगली जिल्हा अध्यक्ष उत्तम ढोले यांच्या उपस्थितीत खेळीमेळीत पार पडली.यावेळी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.या बैठकीत दोन्ही जिल्ह्यांतील पदाधिकारी यांच्या  नियुक्तीचे पत्र प्रतापसिंह पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.
    यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथील डॉ. निवृत्ती पाटील ( N G पाटील ) यांची क्रांती सेना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदी सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.तर युवा क्रांती सेनेच्या  जिल्हाध्यक्ष पदी प्रकाश कारंडे,शेतकरी संघटनेच्या मिरज तालुका अध्यक्ष पदी शामल आवळे,मिरज तालुका उपाध्यक्ष पदी मुरगेंद्र गुदले, पन्हाळा तालुका अध्यक्ष पदी प्रज्वल केरीपळे आदींच्या नियुक्त्या करण्यात आल्या.यावेळी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
   नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे क्रांती सेना संस्थापिका डॉ शालिनीताई पाटील, प्रदेश अध्यक्ष संतोष तांबे, प्रदेश सरचिटणीस नितीन देशमुख, प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील, शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सुभाष चाटे, शिक्षक आघाडीचे भागचंद औताडे सर, प्रदेश संघटक शहाजी कोळपे, मार्गदर्शक नवनाथ वाघ, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेश शिंदे,दिपक पाटील,शेतकरी संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अभिनंदन चौगुले आदींनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या