विलास लाटे : दिवसेंदिवस बांधकाम कामगारांची संख्या वाढत आहे. हे कामगार देश उभा करण्याचे कार्य करत असताना स्वतः शासनाच्या विविध लाभापासून वंचित राहत आहेत. यामुळे या दिवाळीस सर्व नोंदीत कामगारांना दहा हजार रूपये अनुदान द्यावे यासह आदी मागण्याचे निवेदन क्रांतिसेनेच्या वतीने कामगारमंत्री संभाजी निलंगेकर यांना नुकतेच देण्यात आले आहे.
सर्व नोंदीत बांधकाम कामगारांसाठी अडीच लाख रुपयांची आरोग्य विमा योजना सुरू करावी, नोंदणीकृत कामगारांना घरबांधणीसाठी अनुदान द्यावे, 65 वर्षावरील प्रत्येक बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये पेन्शन द्यावी, दिवाळीसणासाठी दहा हजार रुपये अनुदान द्यावे, बांधकाम व घरेलू कामगारांची नोंदणी प्रक्रिया सुलभ करावी, घरेलू कामगारांना दिवाळी सणासाठी वीस हजार रुपये सन्मानधन द्यावे, झोपडपट्टी धारकांना स्वतःचे घर द्यावे अशा मागण्या क्रांतिसेनेचे राज्य सरचिटणीस नितीन देशमुख यांनी दिलेल्या निवेदनातून केल्या आहेत.
0 टिप्पण्या