धुळे : येथील संदीप सोनवणे यांची क्रांतीसेनेच्या खानदेश विभाग प्रमुख पदी निवड करण्यात आली.या निवडीचे पत्र प्रदेश संघटक शहाजी कोळपे यांनी दिले.संदीप सोनवणे यांनी क्रांती सेनेच्या विविध आंदोलनात सहभागी होत ते यशस्वी केले तसेच त्यांचे संघटन कौशल्यामुळे त्यांना खानदेश विभाग प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती क्रांती सेनेचे संपर्क प्रमुख मधुकर म्हसे यांनी दिली.
क्रांती सेना महाराष्ट्र ही संघटना सामाजिक कार्य करत असुन या संघटनेची स्थापना मा. आ. शालिनीताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अस्तित्वात आलेली आहे. या संघटनेचा महत्वाचा उद्देश अन्याय विरोधात लढा व चळवळ करण्याचे काम केले जाते. आर्थिक दुर्बलांसाठी लढा देणे, आरक्षण गुणवत्तेस मारक असल्याने आर्थिक निकषाचे आरक्षण मिळविणे, कामगार, शेतकरी, विद्यार्थी शिक्षक आरोग्य आदी विषयावर पक्ष बांधणी करणे, विभागवार समस्यांवर लढा उभारणे व त्यास न्याय देणे तसेच महाराष्ट्रात तळागळापर्यंत अन्याय विरुद्ध लढण्याचे कामकाज पक्ष संघटनेकडून केले जाते.
या निवडीनंतर क्रांती सेना महाराष्ट्र या पक्ष संघटनेचे अध्यक्ष मा. आ. शालिनीताई पाटील , प्रदेश अध्यक्ष मा. संतोष तांबे, प्रदेश सरचिटणीस नितीन देशमुख, प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील, शिक्षक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भागचंद औताडे सर,शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रतापसिंह पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष सुभाष चाटे, प्रदेश संघटक शहाजी कोळपे, मराठवाडा अध्यक्ष रघुनाथ भोसले, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेश शिंदे, कृष्णा सावंत, गणेश चव्हाण,दिपक फंड आदींनी अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
0 टिप्पण्या