इशारा देताच ग्रामसेवकांची चौकशी सुरू... क्रांती सेनेचे उपोषण तात्पुरते स्थगित...

राहुरी प्रतिनिधी : राहुरी तालुक्यातील डिग्रस ग्रामपंचायतीत होत असलेल्या भ्रष्टाचारात सहभागी ग्रामसेवकांची चौकशीची मागणी १४ सप्टेंबर रोजी क्रांती सेनेने पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली होती.
    क्रांती सेनेच्या कार्यकर्त्यांनी या साठी २७ सप्टेंबर रोजी बेमुदत उपोषणाचा इशारा देताच २२ सप्टेंबर रोजी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दळे साहेब व तुपे साहेब यांनी चौकशी साठी डिग्रस ग्रामपंचायतीत भेट दिली.परंतु ग्रामविकास अधिकारी अरुण सोनवणे हे ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित नव्हते.यामुळे ग्रामपंचायत कारभाराची चौकशी करता आली नाही.लवकरच कारभाराची चौकशी करून क्रांती सेनेला अहवाल सादर करण्याचे लेखी आश्वासन दिले व आमरण उपोषण स्थगित करण्यात यावे अशी विनंती यावेळी विस्तार अधिकारी यांनी केली.
    विस्तार अधिकारी यांनी लेखी आश्वासन दिल्याने २७ सप्टेंबर रोजी करण्यात येणारे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती क्रांती सेनेचे प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष संदीप ओहोळ, जिल्हा अध्यक्ष जालिंदर शेडगे,राहुरी तालुकाध्यक्ष संदीप उंडे, सचिन शिरसाठ,शेखर पवार,गितेश देवरे, गोरक्षनाथ म्हसे,अनिल वाणी,कृष्णा तारडे आदी  कार्यकर्त्यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या