कर्जत प्रतिनिधी : कर्जत तालुक्यातील लोंबकळत असलेल्या विद्युत तारा दुरुस्तीची मागणी क्रांती सेनेने महावितरण कार्यालय अधिकारी खेंद्रे यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे .
निवेदनात म्हटले आहे की, कर्जत तालुक्यात बर्याच ठिकाणी लोंबकळत विद्युत तारा पाहण्यास मिळत आहे.तरी या लोंबकळत असलेल्या विद्युत तारा दुरुस्ती करणे गरजेचे आहे.अशा लोंबकळत असलेल्या विद्युत तारें मुळे जिवहानीच्या अनेक घटना घडल्या आहेत.त्यामुळे या लोंबकळत असलेल्या विद्युत तारें मुळे कोणाचाही बळी जाऊ नये म्हणून लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी.जर अशा लोंबकळत असलेल्या विद्युत तारें मुळे कोणाचा बळी गेला तर संबंधित कार्यालयातील अधिकारी हे या घटनेस जबाबदार राहील. यावेळी निवेदन देताना क्रांती सेनेचे कार्याध्यक्ष सुभाष दरेकर, युवक जिल्हा अध्यक्ष शब्बीर शेख,कर्जत तालुका अध्यक्ष सुनिल धांडे,अक्षय मांडगे,आशिष देशमुख, गोकुळ नेटके,साजन शेख व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या