क्रांतीसेना अहमदनगर जिल्हा कार्यकारणी संदर्भात दि. ०५/०४/२०१७ बुधवार रोजी कृषी माहिती तंत्रद्यान केंद्र राहुरी कृषी विद्यापीठ,राहुरी या ठिकाणी प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष भागचंद औताडे सर,महीला आघाडी प्रदेश संघटक डॉ सुप्रिया कुलथे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी क्रांतीसेनेचे नेते भागचंद औताडे सर यांनी विविध विषयांवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले व संघटनेचे विचार व ध्येय प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीत अहमदनगर जिल्ह्यातील क्रांती सेनेच्या कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हातुन आलेल्या कार्यकर्त्यांबरोबर शेतकरी, विद्यार्थी, महिलांच्या समस्या , संघटना बाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आले. राज्य कार्यकारिणी सदस्य पदी अरुण थोरात सर( श्रीरामपूर) , पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष पदी संदीपभाऊ ओहोळ(राहुरी), अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पदी जालींदर शेडगे पाटील(राहुरी),जिल्हा संपर्क प्रमुख पदी प्रशांत साबळे(अहमदनगर) , युवक जिल्हा अध्यक्ष पदी सागर कातोरे(संगमनेर) ,श्रीगोंदा शेतकरी क्रांतीसेना अध्यक्ष पदी वैभव जाधव, नेवासा तालुका अध्यक्ष पदी महेश इखे , नगर तालुका अध्यक्ष पदी गोरख ढोबळे, उपाध्यक्ष पदी रावसाहेब वारुळे ,शेवगाव तालुका अध्यक्ष पदी संदीप बाटुले, शेवगाव संपर्क प्रमुख पदी रामदास आडकीते ,श्रीरामपूर ग्रामीण तालुका अध्यक्ष पदी आयुब शेख , राहुरी तालुका अध्यक्ष पदी संदीप उंडे , उपाध्यक्ष पदी शरद कैतके , संघटक पदी अनिल वाणी, युवक संपर्क प्रमुख पदी मयुर धसाळ , पंकज बोरुडे, विद्यार्थी जिल्हा सरचिटणीस पदी दादासाहेब वने आदींच्या नियुक्ती करण्यात आली.
यावेळी सुभाष तारडे , ज्ञानेश्वर भिंगारदे , मच्छिंद्र जगताप सर , नयनाताई शहाणे, प्रशांत औताडे( राहुरी), प्रशांत औताडे(श्रीरामपूर), सतीश गायकवाड, बाबासाहेब इखे , आकाश ओहोळ, रोहीत जाधव , किरण चक्रनारायण , बाळासाहेब पवार, विशाल थेटे , विजय आडागले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या