क्रांती सेनेच्या वतीने आज बांधकाम विभाग जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग अहमदनगर तसेच जिल्हा आधिकारी कार्यलय अहमदनगर यांना राहुरी तालुकातील कोंढवड, शिलेगाव व केंदळ या गावातील रस्ते व पुल दुरुस्तीसाठी क्रांती सेनेच्यावतीने निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की , कोंढवड , शिलेगाव व केंदळ या भागातील रस्ते अतिशय खराब झाले आहे. ते मातीचे आहे का डांबरी हेच ओळखत नसुन ते रस्ते दुरुस्तीसाठी अनेक वेळा ग्रामस्थांनी तसेच क्रांती सेनेनी मागणी करुन देखील या मागणी कडे जिल्हा परिषद उपविभाग राहुरी व सार्वजनिक बांधकाम विभाग राहुरी यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे या भागातील नागरिकांना या रस्त्यानी ये जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. हे रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आले आहे.
या आधिकर्याकडे अनेक वेळा मागणी करुन देखील दुर्लक्ष केल्याने या आधिकार्याला शासकीय सेवेतुन बडतर्फ करण्यात यावे ही मागणी जिल्हा आधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. या मागण्या लवकरात लवकर पूर्ण नाही झाल्या तर बांधकाम विभागाच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा क्रांती सेनेने दिला आहे.
या निवेदनावर क्रांती सेनेचे युवक जिल्हा सरचिटणीस गितेश देवरे यांची स्वाक्षरी आहे. यावेळी किरण साळवे, संकेत गायकवाड, किरण नेटके, शिवम् देवगुने, करण साळवे, अभिषेक सर्जे, आशीष भालेराव आदी क्रांती सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या