अहमदनगर येथे बळीराजा जिवनदाई योजनेचा प्रारंभ

अहमदनगर_बळीराजा_

    "इडा पिडा टळू दे बळीराजा चे राज्य येवू दे" या उक्ती प्रमाणे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत विविध समस्या आ वासून उभ्या आहेत .म्हणून शेतकरी वर्गाला आधार म्हणून " क्रांतीसेना शेतकरी आघाडी  मार्फत  बळीराजा जीवनदायी योजनेचा शुभारंभ आज दि .31/10/2016 रोजी अहमदनगर येथे संपन्न झाला " 
          सदर कार्यक्रमा वेळी प्रदेश अध्यक्ष मा.संतोष तांबे , प्रदेश सरचिटनीस नितीन भैया देशमुख ,  प्रदेश संपर्क  प्रमुख मधुकर म्हसे पाटील , भागचंद्र औताडे आदि मान्यवर उपस्थित होते. सदर योजने मध्ये महाराष्टातील सर्व जिल्ह्यातील  शेतकरी मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते .बळीराजा योजनेमध्ये कोणकोणत्या योजना आहेत व त्याचा शेतकर्यांना कसा फायदा होईल याची माहिती ही देण्यात आली सर्व योजना ह्या शेतकर्यांच्या आर्थिक बाबतीत फायदेशीर असतील अशी माहिती सुभाष चाटे यांनी दिली. तसेच अहमदनगर जिल्ह्यातून  शेतकरी आघाडी च्या प्रदेश संपर्क म्हणुन सुभाष चाटे आणि प्रदेश अध्यक्ष म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातून प्रतापसिंह पाटील ह्यांची  निवड करण्यात आली.
माफक दरातील योजना=
1) खते ,ओषधे , बी-बीयाणे 
2) मिनी रेशनिंग 
3) आधुनिक शिक्षण प्रणाली 
इ. योजनांचा शुभारंभ करण्यात आला अशी माहिती प्रगतशील प्रगतशील शेतकरी सुभाष चाटे ह्यांनी दिली .कार्यक्रम अध्यक्ष निवड  बाजीराव गागरे ह्यांनी, त्यास अनुमोदन नागेश लोणकर तर  सूत्रसंचलन योगेश सजगुरे व  आभार प्रदर्शन मधुकर  म्हसे पाटील  यांनी केले.  सदर योजनेत शेतकरी वर्गांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होवून योजनेचा लाभ घ्यावा असेही आवाहन करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या