राहुरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी कांदा बियाणे विक्री करताना शेतकऱ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्ज चा क्रांतीसेनेच्या वतीने विद्यापीठ प्रशासनाला निवेदन देऊन निषेध करण्यात आला.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दि. २८/०५/२०१८ रोजी विद्यापीठ कार्यस्थळी कांदा बियाणे विक्री सुरू करण्यात आले होते.या वेळी विद्यापीठाने ७ ठिकाणी विक्री केंद्र उभारण्यात आले होते. विद्यापीठ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे व ढसाळ नियोजनामुळे शेतकऱ्यांमध्ये बियाणे खरीदी करताना गोंधळ उडाला. या दरम्यान विद्यापीठ प्रशासनाकडून स्वत:च्या ढसाळ नियोजनामुळे शेतकऱ्यांमध्ये बियाणे खरीदी करताना गोंधळ उडणार्या शेतकऱ्यांवर अमानुष लाठीचार्ज करण्यात आला. यामुळे काही शेतकऱ्यांना दुःखापत होऊन ते जखमी झाले आहे.शेतकरी हे बियाणे खरीदी करण्यासाठी या ठिकाणी आले होते,ते तेथे दरोडा टाकायचा म्हणून नव्हते जमले.यामुळे नियोजन शून्य विक्री करणाऱ्या व लाठीचार्ज करणार्यांवर कठोर कारवाई करावी. या मागणीचे निवेदन विद्यापीठ प्रशासनाला देण्यात आले.
या वेळी क्रांती सेनेचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष संदीप ओहोळ, जिल्हा अध्यक्ष जालिंदर शेडगे,राहूरी पंचायत समितीचे माजी सदस्य सचिन भिंगारदे,आर पी आय नेते बाळासाहेब जाधव,डिग्रस ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर भिंगारदे,राजु बेल्हेकर, सचिन गावडे,बापु दळे व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या