मराठा समाजाला आरक्षण द्या : म्हसे

अहमदनगर/ प्रतिनिधी
      मराठा समाजाची सध्याची दयनीय स्थिती लक्षात घेऊन मराठा समाजाला आरक्षण देऊन त्यांना इतर मागास प्रवर्गात ( ओ. बी.सी.) मध्ये समाविष्ट करण्याची मागणी क्रांती सेनेच्या वतीने राज्य मागासवर्ग आयोगाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
   सध्याच्या परिस्थितीत मराठा समाज अत्यंत मागासलेल्या स्थितीत आहे.त्यामुळे मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण देणे अत्यावश्यक झाले आहे.समाजातील जवळपास ८० % नागरिक ग्रामीण भागात राहतात.त्यातील मोठ्या प्रमाणात नागरिक शेती, शेतमजुरी व इतर अंगमेहनतीची कामे करून स्वत:चा व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे. तसेच त्यांचे आर्थिक उत्पन्न हे एक लाख रुपये पेक्षा कमी आहे.या सर्व कारणांमुळे मराठा समाजाची मुलांना शिक्षण देण्याइतपत आर्थिक परिस्थिती राहिलेली नाही. बहुतांश स्त्रियांना शारिरीक श्रमाची कामे करावी लागतात.समाजाचे राहणीमान व सामाजिक जीवन दिवसेंदिवस निकृष्ट दर्जाचे बनले आहे. मराठा समाज माहिती तंत्रज्ञान, संवाद व शासनाच्या इतर योजनेपासून आरक्षणाअभावी वंचित राहत चालला आहे.त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी क्रांतीसेनेच्या वतीने राज्य मागासवर्ग आयोगाकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे व या निवेदनाबरोबर मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून  कोंढवड, शिलेगाव, हिरडगाव या ग्रामपंचायतीचे ठराव देण्यात आले.
   या मागणीचे निवेदन देताना क्रांती सेनेचे प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे, गोरक्षनाथ माळवदे, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष जालिंदर शेडगे, जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दरेकर, जिल्हा सल्लागार साहेबराव जाधव, श्रीगोंदा तालुका अध्यक्ष संदीप डेबरे, प्रशांत साबळे, कैलास दरेकर आदी पदाधिकारी व संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या