श्रीगोंदा/ प्रतिनिधी : आज श्रीगोंदा येथे श्रीगोंदा व कर्जत तालुक्यातील क्रांतिसेना पदाधिकारी यांची संयुक्त बैठक पार पडली. यामध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर तसेच दोन्ही तालुक्यात पक्ष संघटन मजबूत करण्यावर चर्चा करन्यात आली. यावेळी कर्जत युवक तालुका अध्यक्ष अक्षय मांडगे यांची आसाम रायफल मध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार क्रांतिसेनेच्या वतीने करण्यात आला .
यावेळी नवीन पदाधिकारी निवडी करण्यात आल्या. जेष्ठ मार्गदर्शक साहेबराव जाधव यांची दक्षिण अहमदनगर कायदेशीर सल्लागार पदी निवड करण्यात आली;श्रीगोंदा तालुका शेतकरी अध्यक्ष वैभव जाधव यांची दक्षिण अहमदनगर जिल्हा संपर्क प्रमुख शेतकरी आघाडी पदी निवड करण्यात आली ; श्रीगोंदा तालुका अध्यक्ष पदी संदीप डेबरे , कर्जत तालुका युवक अध्यक्ष पदी साजन शेख ; श्रीगोंदा तालुका संपर्क प्रमुख पदी समीर शिंदे ; श्रीगोंदा तालुका कायदेशीर सल्लागार पदी आनंद धस ; कर्जत तालुका कायदेशीर सल्लागार पदी अक्षय मांडगे ; श्रीगोंदा तालुका युवक अध्यक्ष पदी विकास म्हस्के आदींच्या निवडी करण्यात आल्या .या निवडी दक्षिण अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष अविनाश कुरूमकर आणि जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दरेकर यांनी जाहीर केल्या.
अक्षय मांडगे यांना आणि नवीन जाहीर करण्यात आलेल्या कार्यकरणीला क्रांतिसेनेच्या संस्थापिका माजी महसूलमंत्री डॉ शालिनीताई पाटील, प्रदेश अध्यक्ष संतोष तांबे, प्रदेश सरचिटणीस नितीनभैय्या देशमुख, प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील , शिक्षक आघाडीचे अध्यक्ष भागचंद औताडे सर,शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रतापसिंह पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष सुभाष चाटे,प्रदेश संघटक शहाजीराजे कोळपे,पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष संदीप ओहोळ, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष जालिंदर शेडगे आदींनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहे.
0 टिप्पण्या