मुळा नदीवर कोंढवड तांदुळवाडी तिरावर केटी वेअर बांधण्याची मागणी,

राहुरी/प्रतिनिधी - मुळा नदीवर कोंढवड- तांदुळवाडी तीरावर केटी वेअर ( साठवण बंधारा ) बांधण्याची मागणी निवासी तहसीलदार तळेकर यांच्याकडे गावकऱ्यांनी व क्रांतिसेनेच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे.
     निवेदनात म्हटले आहे की, राहुरी तालुक्यात औद्योगिक प्रगती नसल्याने या भागातील लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे.शेतीसाठी पाणी पुरवठा असणे आवश्यक बाब आहे.महाराष्ट्रात सतत पडणाऱ्या दुष्काळाच्या झळा या भागातही जाणवत आहे.उन्हाळ्यात विहिरी व बोअरवेल कोरडे पडत आहे. या सर्व कारणांमुळे या भागातील पाण्या अभावी शेती पिके जळतात व परिणामी शेती उत्पन्न कमी होत आहे,या सर्व प्रकारामुळे या भागातील शेतकरी कर्जबाजारी बनत चालला आहे.महागाईच्या काळात शेती मालाला हमीभाव मिळत नसल्याने घरखर्च कसा करावा या विचारातून त्यांच्या मनात आत्महत्या करण्याचा विचारही येत आहे.हा साठवण बंधारा बांधला तर कोंढवड गावाबरोबर आसपासच्या तांदुळवाडी,शिलेगाव, उंबरे, देसवंडी, राहुरी खुर्द, पिंप्री अवघड, गोटुंबा आखाडा आदी गावांतील शेतकऱ्यांना या साठवण बंधाऱ्यामुळे फायदा होईल. या बंधाऱ्यामुळे येथील शेतकरी नक्कीच आनंदी होईल.तरी हा केटी वेअर बांधण्यात यावा ही मागणी  गावकऱ्यांनी केली आहे.
     निवेदनावर आण्णा पाटील म्हसे, प्रभाकर म्हसे, मधुकर म्हसे, गोरक्षनाथ माळवादे, जालिंदर शेडगे,संदीप ओहोळ, अशोक हिवाळे, गोरक्षनाथ म्हसे,अमोल हिवाळे,राजेंद्र म्हसे, योगेश भिंगारदे, ऋषीकेश म्हसे,राहुल हिवाळे,नरेंद्र म्हसे,बापूसाहेब म्हसे,आदिनाथ पवार, व शेकडो शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या